बकरी ईदवर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी, मंदिरांमध्ये बाली तर्पणवर बंदी


वृत्तसंस्था

तिरूअनंतपूरम : बकरी ईद वर निर्बंध न लादलेल्या केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी मंदिरांमध्ये बाली तर्पण वर बंदी घालण्यात आली आहे. अनेक मंदिरांनी ही बंदी स्वीकारली आहे. परंतु दोन धर्मांच्या धार्मिक कृत्यांमधल्या भेदभावाबद्दल नाराजी देखील व्यक्त केली आहे. Ban on Bali Tarpan in public places, temples in Kerala without restrictions on Goat Eid

केरळच्या सरकारने बकरी ईद सणावर सार्वजनिकरीत्या बंदी घातली नव्हती. त्यावेळी सुप्रीम कोर्टात जाऊन ही बंदी आणावी लागली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केरळच्या डाव्या सरकारने कोविल प्रोटोकॉल नुसार बकरी ईद साजरी करावी, असे आदेश काढले होते.

आज दीप अमावस्या आहे. केरळमध्ये “कारकिडाका वाहू” म्हणजे दीप अमावस्या पाळली जाते. या दिवशी लोक आपल्या पूर्वजांना मंदिरांमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या किंवा घरी बाली तर्पण करून श्रद्धांजली वाहतात.

मात्र केरळच्या डाव्या सरकारने या बाली तर्पण वर सार्वजनिक बंदी आणली आहे. बाली तर्पण कोविड प्रोटोकॉल पाळून घरातच करावे, असे आदेश काढले आहेत. केरळमधील विविध मंदिरांमध्ये तशा सूचना सरकारने लावल्या आहेत. यातून एक प्रकारे केरळचे डावे सरकार हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक प्रथांमध्ये कसा भेदभाव करते हे दिसून आले आहे.

Ban on Bali Tarpan in public places, temples in Kerala without restrictions on Goat Eid

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात