भारत आणि चीनच्या सैन्याची गोगरा भागातून माघारी, पुन्हा घुसखोरी न करण्याची चीनची ग्वाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – भारत आणि चीनने गोगरा भागातून दोन्ही बाजूंचे सैन्य माघार घेतले आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली सर्व बांधकामेदेखील हटविण्यात आली आहेत. Indo – china troops take behind from bordres

ताबारेषेवर मे २०२० पूर्वीची यथास्थिती पूर्ववत असावी ही भारताची भूमिका आहे. पॅंगान्ग सरोवराच्या फिंगर क्षेत्रात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यामुळे तणाव वाढला असून केवळ लडाख सीमा नव्हे तर अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. ही परिस्थती निवळण्यासाठी दोन्ही बाजूंचे राजनैतिक आणि लष्करी पातळीवर वाटाघाटींचे प्रयत्न सुरू आहेत.

अलिकडेच दोन्ही देशांदरम्यान कोअर कमांडर पातळीवरील चर्चेची १२ वी फेरी ३१ जुलैला मोल्डो येथे झाली होती. चर्चा सकारात्मक असल्याचे भारत आणि चीनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले होते. मात्र, तपशील देण्यात आला नव्हता. अखेरीस गोगरा भागातील १७ ए या गस्तीबिंदूवरून दोन्हीकडील सैन्य माघार पूर्ण झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून औपचारिक घोषणा आली.

३१ जुलैला ताबारेषेवरील सैन्य माघारीबाबत भारत-चीनमध्ये सखोल चर्चा झाली होती. यामध्ये गोगरा भागात टप्प्याटप्प्याने सैन्य माघारीवर सहमती होऊन ही प्रक्रिया ४ आणि ५ ऑगस्टला पूर्ण झाली. आता दोन्ही बाजूंकडील सैन्य लष्करी तळांवर परतले असून या भागात उभारण्यात आलेली अस्थायी बांधकामे, पायाभूत सुविधाही नष्ट करण्यात आल्या आहेत.

Indo – china troops take behind from bordres

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण