विशेष प्रतिनिधी
काबूल – लॉंग वॉर जर्नलच्या मते, अफगाणिस्तानच्या २२३ जिल्ह्यांवर तालिबानचे वर्चस्व आहे. त्याचवेळी ३४ प्रांतांच्या राजधानीपैकी १७ वर तालिबानचा थेट धोका आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचा वरचष्मा होण्याचा धोका आहे. Taliban controls most part of Afganistan
अर्थात अफगाणिस्तानचे सैनिक तालिबानशी दोन हात करत आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि अन्य देशांनी देखील अफगाणिस्तानला मदतीसाठी हात पुढे केला आहे. अफगाणिस्तान सुरक्षा दलाने लश्कचरगा येथे केलेल्या कारवाईत तालिबान आणि अल कायदाचे ९० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
तसेच १६ जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तान सैनिकांच्या अभियानात तालिबानचा हेलमंद प्रांतातील रेड युनिट कमांडर मावलावी मुबारक हा मारला गेला. मलावीसह ९४ तालिबानी, अल कायदाचे दहशतवादी ठार झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.
अफगाणिस्तानात गेल्या सहा महिन्यांत १६५९ नागरिक ठार तर ३२५४ जण जखमी झाल्याचे सरकारी सूत्राने म्हटले आहे. मे महिन्यांत हिंसाचाराचे प्रमाण वाढले असून विशेषत: अफगाणिस्तानातून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाल्याने नागरी वस्तीवर हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानच्या पूर्वोत्तर प्रांत तखरसह अनेक जिल्ह्यात ताबा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App