बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे त्या वेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलेले, “बडे शहरो मे छोटे छोटे हादसे होते रहते है”, हे वक्तव्य खूप गाजले होते. त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता अशाच प्रकारचे वक्तव्य इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या महत्त्वाच्या केंद्र सरकारच्या संस्थेचे महासंचालक दिनेश पटनाईक यांनी केले आहे. Attacks on Hindus in Bangladesh “small incidents”; Controversial statement by the Director General of the Indian Council for Cultural Relations

बांगलादेशात दुर्गा पूजेवर हल्ले करून धर्मांध मुस्लिमांनी हिंदूंचे शिरकाण केले. त्यानंतर हिंदू वस्त्यांना आगी लावल्या. हिंदूंवर अनेक ठिकाणी हल्ले केले. बांगलादेशच्या विविध शहरांमध्ये हिंदूंवर असे हल्ले चार-पाच दिवस सुरू राहिले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यासंबंधात आवाज उठवला गेला.

पण या सर्व बाबींना दिनेश पटनाईक यांनी “छोट्या घटना” असे संबोधले आहे. छोट्या घटनांचे भारत-बांगलादेश राजनीतिक संबंधांवर परिणाम होत नसतात, असे वक्तव्य दिनेश पटनाईक यांनी करून नवा वाद ओढवून घेतला आहे. तसेच सरकारी सरकारी बाबूशाहीची मनोवृत्ती किती असंवेदनशील आणि निर्ढावलेली आहे, हे दर्शवून दिले आहे.



भारत आणि बांगलादेश यांच्या राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशांचे राजकीय नेते पुरेसे परिपक्व आहेत. दोन्ही देशांचे सर्व प्रकारचे संबंध सुरळीत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. छोट्या छोट्या घटनांनी दोन देशांच्या संबंधांमध्ये राजनैतिक संबंधांमध्ये फारसा फरक पडत नाही, असे वक्तव्य दिनेश पटनाईक यांनी केले आहे.

सौदी अरेबियात योग लोकप्रिय होत आहे. अनेक लोक योग साधना करताना दिसत आहेत. सौदी अरेबिया सरकारकडून नुकतीच भारताकडे तेथे भारतीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचा विचार इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स सकारात्मक दृष्टीने करते आहे, अशी माहिती दिनेश पटनाईक यांनी दिली आहे.

Attacks on Hindus in Bangladesh “small incidents”; Controversial statement by the Director General of the Indian Council for Cultural Relations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात