अमेरिकेत गोळीबार ही महामारी, राष्ट्रपती बायडन यांची खंत , चार शिखांच्या हत्येबाबत हळहळ ; हल्लेखोराचीही आत्महत्या


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्याबद्दल राष्ट्रपती जो बायडन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून गोळीबारातील हिंसाचार एक महामारी बनली आहे, असे म्हंटले. Attack on FedEx center 4 Sikh person death in America

अमेरिकेतील इंडियाना राज्यात एका फेडेक्स सेंटरवर झालेल्या गोळीबारात भारतीय वंशाच्या चार शीख बांधवांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.



या गोळीबारात आठ जणांना जीव गेला आहे. हल्लेखोर ब्रँडन स्कॉटने (वय 19) स्वतः वरही गोळी झाडली. तो इंडियानातील रहिवासी आहे. तो फेडेक्सचा माजी कर्मचारी होता.
फेडेक्स सेंटरमध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचं काम करणाऱ्या लोकांमध्ये 90 टक्के लोकं भारतीय- अमेरिकन आहेत. यातील बहुतांशी स्थानिक शीख आहेत. शीख समुदायाचे नेते गुरिंदर सिंह खालसा यांनी म्हटलं की, ‘ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून संपूर्ण शीख समुदाय दुःखात आहे.

मॅरियन काउंटी कोरोनरच्या कार्यालयानं मृतांची ओळख पटवली आहे. त्यांची नाव- 32 वर्षीय मॅथ्यू आर. अलेक्झांडर, 19 वर्षीय सामरिया ब्लॅकवेल, 66 वर्षीय अमरजीत जोहल, 64 वर्षीय जसविंदर कौर, 68 वर्षीय जसविंदर सिंह, 48 वर्षीय अमरजीत सेखों, 19 वर्षीय करली स्मिथ आणि 74 वर्षीय जॉन वीसर्ट अशी आहेत.

Attack on FedEx center 4 Sikh person death in America

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात