firing at FedEx complex in the US : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील फेडएक्स कंपनी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील 4 जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. शीख समुदायातील नेत्यांनी ही माहिती दिली. इंडियाना येथील 19 वर्षीय ब्रेंडन स्कॉट होल असे बंदूकधारी हल्लेखोराचे नाव आहे. त्याने गुरुवारी रात्री उशिरा इंडियाना पोलीसच्या फेडएक्स कंपनीच्या कॅम्पसमध्ये गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडल्याचा आरोप आहे. At least 8 including 4 Sikhs killed in firing at FedEx complex in the US
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील फेडएक्स कंपनी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील 4 जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. शीख समुदायातील नेत्यांनी ही माहिती दिली. इंडियाना येथील 19 वर्षीय ब्रेंडन स्कॉट होल असे बंदूकधारी हल्लेखोराचे नाव आहे. त्याने गुरुवारी रात्री उशिरा इंडियाना पोलीसच्या फेडएक्स कंपनीच्या कॅम्पसमध्ये गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडल्याचा आरोप आहे. डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या या कॅम्पसमध्ये काम करणारे 90 टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत. त्यातील बहुसंख्य शीख समुदायाचे आहेत.
फेडएक्स कॅम्पसमधील पीडित कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर शीख समुदायाचे नेते गुरिंदरसिंग खालसा म्हणाले, “ही अत्यंत वाईट घटना आहे. या घटनेने शीख समुदाय दुखावला आहे.” शुक्रवारी रात्री उशिरा मेरियन काउंटी कोरोनर कार्यालय आणि इंडियाना पोलिस महानगर पोलिस विभाग (आयएमपीडी) यांनी मृतांची नावे उघड जाहीर केली. मृतांमध्ये अमरजित जोहल (66), जसविंदर कौर ( 64), अमरजीत (48) आणि जसविंदर सिंग (68) यांचा समावेश आहे. आयएमपीडीने सांगितले की, शीख समाजातील आणखी एक व्यक्ती हरप्रीतसिंग गिल (45) याला डोळ्याजवळ गोळी लागली असल्याने ते सध्या रुग्णालयात आहेत. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वी हल्लेखोराने स्वत:वर गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. फेडएक्सने दुजोरा दिला आहे की, हल्लेखोर इंडियाना पोलिसमधील कंपनीचा माजी कर्मचारी होता.
गुरिंदरसिंग खालसा म्हणाले की, समुदायाचे नेते अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ते म्हणाले, “9/11पासून शीख समुदायाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. गोळीबार होण्याच्या अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची वेळ आता आली आहे.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी या दु:खद घटनेवर शोक व्यक्त केला आहे. बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “होमलँड सिक्युरिटी येथील पथकाद्वारे उपराष्ट्रपती हॅरिस आणि मी यांना इंडियाना पोलिसच्या फेडएक्स कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाली आहे. तेथे एका बंदूकधाऱ्याने केलेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले.”
अमेरिकेच्या दौर्यावर आलेल्या जपानचे पंतप्रधान योशिहिद सुगा यांनी व्हाइट हाऊसमधील बैठकीच्या सुरुवातीला मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “निष्पाप नागरिकांनी अशा प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडू नये. स्वातंत्र्य, लोकशाही, मानवी हक्क आणि कायद्याचे शासन ही जागतिक मूल्ये आहेत जी आपल्याला एकत्र करतात आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात टिकून आहेत.” बायडेन यांनी मृतांच्या सन्मानार्थ व्हाइट हाऊस आणि इतर फेडरल इमारतींवर अर्ध्यावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आदेश दिले आहेत.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पत्रकारांना सांगितले की, “आपल्या देशात अशी कुटुंबे आहेत ज्यांनी हिंसाचारामुळे आपले कुटुंबीय गमावले आहे.” अर्थात हिंसाचार संपलाच पाहिजे. आम्ही अशा कुटुंबांबद्दल चिंतित आहोत, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे.”
At least 8 including 4 Sikhs killed in firing at FedEx complex in the US
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App