Maharashtra Curfew 2021 : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संचारबंदीचे नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही!

Deputy CM Ajit Pawar said, if Maharashtra Curfew 2021 rules not followed, then lockdown in state

Maharashtra Curfew 2021 : कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या महामारीचा सर्वात मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या प्रचंड आहे. यासाठी राज्यशासनाने 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी देण्यात आलेल्या वार्षिक फंडातून सर्व आमदारांना / एमएलसींना कोरोनासंबंधित एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी 50 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी होती. Deputy CM Ajit Pawar said, if Maharashtra Curfew 2021 rules not followed, then lockdown in state


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात या महामारीचा सर्वात मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या प्रचंड आहे. यासाठी राज्यशासनाने 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी देण्यात आलेल्या वार्षिक फंडातून सर्व आमदारांना / एमएलसींना कोरोनासंबंधित एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी 50 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी होती.

संचारबंदीचे नियम पाळा, लॉकडाऊन टाळा

अजित पवार म्हणाले की, राज्यात लादलेल्या कोरोना संबंधित निर्बंधांचे पालन न केल्यास गतवर्षीप्रमाणे आम्हालाही संपूर्ण लॉकडाउन लागू करावे लागू शकते. ते म्हणाले, ‘खासगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांची कुटुंबे संसर्गाची तीव्रता विचारात न घेता रेमडेसिव्हिर औषधाची व्यवस्था करण्यासाठी डॉक्टरांवर दबाव आणत आहेत. अशा परिस्थितीत मी डॉक्टरांना विनंती करतो की केवळ गंभीर आणि महत्त्वाच्या केसमध्येच या औषधाचा वापर करावा. हे लागू करण्यासाठी त्यांनी काहीही करावे, आम्हीही यावर काम करत आहोत.”

शुक्रवारी राज्यात कोरोनाचे 63,729 नवीन रुग्ण

शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 63,729 नवीन रुग्ण आढळले, जे आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक आढळले आहेत. यासह राज्यात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 37 लाखांहून अधिक झाली आहे, तर 398 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात आता एकूण बाधितांचा आकडा 37,03,584 वर गेला आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा 59,551 वर गेला आहे.

राज्यात सहा लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण

यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक 63,294 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 एप्रिल रोजी राज्यात 61,695 रुग्णांची नोंद झाली. ते म्हणाले की, शुक्रवारी, 45,335 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या लोकांची संख्या 30,04,391 पर्यंत गेली आहे. आता राज्यात सध्या 6,38,034 सक्रिय रुग्ण आहेत.

Deputy CM Ajit Pawar said, if Maharashtra Curfew 2021 rules not followed, then lockdown in state

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात