तेहरीके लब्बैकवरील बंदीनंतर पाकिस्तानमध्ये हिंसेचा आगडोंब, ३०० पोलिस जखमी, सोशल मीडिया बंद


विशेष प्रतिनिधी 

इस्लामाबाद : तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनात मोठा हिंसाचार झालाअसून यात किमान ३०० पोलिस जखमी झाले, तर सात पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.Tense situation in Pakistan, ban on social media

यामुळे पाकिस्तान सरकारने या संघटनेवरच बंदी आणली आहे.आता संघटित निदर्शने टाळण्यासाठी पाकिस्तान सरकारने आज ट्वीटर, फेसबुक आणि व्हॉट्‌सॲप या सोशल मीडिया सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



प्रेषित महंमद यांचे व्यंग्यचित्र पुन्हा प्रसिद्ध करण्याच्या फ्रान्समधील नियतकालिकाच्या अधिकाराचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काही महिन्यांपूर्वी समर्थन केल्यावर पाकिस्तानात फ्रान्सविरोधी भावना बळावत चालली आहे.

याचाच परिणाम म्हणून ‘टीएलपी’ या संघटनेने फ्रान्सच्या राजदूताच्या हकालपट्टीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर सरकारने या संघटनेचा म्होरक्या साद हुसेन रिझवी याला अटक केली. यामुळे त्याच्या समर्थकांनी देशभर हिंसक आंदोलन सुरु केले.

Tense situation in Pakistan, ban on social media

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात