The Lancet Report : हवेतून का पसरतोय कोरोना?, सविस्तर वाचा ‘द लान्सेट’च्या अहवालातील १० ठळक मुद्दे

Why Corona Spreads Through the Air ?, Read the Top 10 Top Points From The Lancet Report

The Lancet Report : भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा विषाणू वेगाने आपले रूपही बदलतोय. भारतात तर दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. यादरम्यान प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालित द लान्सेटने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, कोरोनाचा संसर्ग प्रामुख्याने हवेतून होत आहे. यामुळे आपण जी कोरोना नियमावली पाळत आहोत, त्यातही तातडीने बदलाची गरज आहे. Why Corona Spreads Through the Air ?, Read the Top 10 Top Points From The Lancet Report


विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा विषाणू वेगाने आपले रूपही बदलतोय. भारतात तर दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. यादरम्यान प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालित द लान्सेटने आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, कोरोनाचा संसर्ग प्रामुख्याने हवेतून होत आहे. यामुळे आपण जी कोरोना नियमावली पाळत आहोत, त्यातही तातडीने बदलाची गरज आहे.

हा अहवाल इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी तयार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस हवेतून पसरत नाही, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. बहुतांश शास्त्रज्ञांनीही यावरच विश्वास व्यक्त केला आहे. नवीन अहवालाच्या आधारे तज्ज्ञांनी कोविड-19 सुरक्षा नियमावलीत त्वरित बदल करण्याची सूचना केली आहे.

जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल द लान्सेटने आपल्या नवीन अहवालात असा दावा केला आहे की, हा विषाणू हवेमार्फत पसरत आहे. तो हवेतून का व कसा पसरतोय हे सिद्ध करण्यासाठी जर्नलने यासाठी 10 कारणे दिली आहेत.

हवेतून का पसरतोय कोरोना? 10 ठळक मुद्दे

1. व्हायरसचे सुपरस्प्रेडिंग इव्हेंट SARS-COV-2 विषाणूला वेगाने पसरवतात. खरंतर, हे या महामारीचे सुरुवातीचे वाहक असू शकतात. असा प्रसार थेंबांऐवजी हवेतून होणे सहज शक्य आहे.

2. उदा. क्वारंटाइन हॉटेल्समध्ये एकमेकाला लागून असलेल्या खोल्यांमधील व्यक्तींमध्ये हा संसर्ग आढळून आलाय, हे लोकं ऐकमेकांच्या खोल्यांमध्ये गेलेही नव्हते, तरीही विषाणूचा प्रसार आढळलाय.

3. तज्ज्ञांचा असा दावा आहे की, खोकला किंवा शिंका येत नसूनही सर्व कोविड-19 प्रकरणांपैकी 33 ते 59 टक्के हे लक्षणे नसलेल्या किंवा लक्षणे असलेल्या ट्रान्समिशनसाठी जबाबदार असू शकतात.

4. आउटडोर (बाहेर) पेक्षा विषाणूचे संक्रमण इनडोर (घरातून) जास्त होते आणि जर घरात योग्य व्हेंटिलेशन असेल तर विषाणूच्या प्रसाराची संभाव्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

5. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरल्या त्या ठिकाणी नोसोकॉमियल इन्फेक्शन (जे रुग्णालयात उद्भवतात) देखील आढळले. पीपीई किट ही थेट संपर्क आणि ड्रॉपलेटपासून सुरक्षेसाठी बनविली गेली आहे, परंतु हवेतून प्रसार टाळण्याचा कोणताही मार्ग नाही.

6. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सार्स-कोव्ह -2 हवेत सापडला आहे. सार्स-कोव्ह-2 विषाणू लॅबमध्ये कमीत कमी 3 तास हवेत संसर्गजन्य राहिलेला दिसून आला आहे. कोरोना रुग्णांच्या खोल्या आणि कारमधील हवेच्या नमुन्यांमध्येही हा विषाणू आढळून आला.

7. कोरोना रुग्णालयांतील एअर फिल्टर्स आणि बिल्डिंग डक्ट्समध्येही हा विषाणू आढळला आहे. या ठिकाणी फक्त हवेच्या माध्यमातूनच विषाणू पसरू शकतो.

8. तज्ज्ञांना आढळले की, पिंजऱ्यांमध्ये बंद प्राण्यांनाही विषाणूची बाधा झाली. हे एअर डक्टच्या माध्यमातूनच घडले.

9. तज्ज्ञ असेही म्हणतात की, हा विषाणू हवेतून पसरत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत.

10. त्यांचा अखेरचा युक्तिवाद असा आहे की, श्वासोच्छवासाचे थेंब किंवा फोमाइटसारख्या इतर मार्गांनी व्हायरस पसरल्याचे जसे पुरावे आहेत, तसे इतर मार्गांनी तो पसरू शकतो याचे फारसे पुरावे नाहीत.

जर तज्ज्ञांचा हा नवीन दावा सिद्ध झाला आणि मान्य केला तर कोरोनाविरुद्ध लढाईतील रणनीतीत संपूर्ण जगाला बदल करावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला आता घरातही मास्क घालून राहावे लागू शकते. कदाचित तो कायमच तोंडावर लावावा लागेल.

Why Corona Spreads Through the Air ?, Read the Top 10 Top Points From The Lancet Report

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी