विशेष प्रतिनिधी
हरिद्वार – कुंभमेळ्यात कोरोनाची साथ वेगाने पसरत असून मेळ्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने नागा संन्याशींच्या मोठ्या आखाड्यांपैकी एक निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा शुक्रवारी केली. या आखाड्याच्या १७ संतांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. Niranjani Akhda withdraw from kumbmela
हरिद्वार शिबिरातील अनेक संत व त्यांच्या अनुयायांना कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे आमच्या आखाड्याच्या संतांनी कुंभमेळ्याची सांगता करण्याचा निर्णय घेतला आहे. या आखाड्याच्या ज्या १७ संतांना कोरोना झाला आहे,
त्यांनी रॅपिड अँटिजेन चाचणी केली होती. संसर्ग झालेल्या संतांना त्यांच्या छावण्यांमध्ये विलगीकरणात ठेवले जात आहे. आनंद आखाड्यानेही शनिवारी कुंभमेळ्या त त्यांचा शेवटचा दिवस असेल, असे काल जाहीर केले होते. मात्र कुंभमेळा लवकर संपविण्यावर सर्व आखाड्यांचे एकमत होऊ शकलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App