वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप बरोबरचा राजकीय संघर्ष आता त्रिपूरात नेला आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी त्रिपूराची जबाबदारी सोपविली आहे. त्रिपूरा जिंकण्याचा दावा त्यांनी केला आहे.Astonishing that everything happened in front of Police and no medical attention was provided. BJP is a monstrous party. From Assam to UP they didn’t let us enter.
त्रिपूरात गेल्या दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधून गेलेले कार्यकर्ते आणि नेते यांची भाजप नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी झडप झाली. यात तीन कार्यकर्ते जखमी झाले. या संघर्षावर ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, त्रिपूरात अभिषेक बॅनर्जी यांनाच इजा पोचविण्याचा भाजपच्या गुंडांचा इरादा होता.
ते सगळे अमित शहांच्या पाठिंब्याने गुंडगिरी करीत असतात. पश्चिम बंगाल सरकारने खासदार अभिषेक बॅनर्जी यांना बुलेटप्रूफ गाडी दिली म्हणून बरे झाले. ते हल्ल्यातून वाचले. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. ते तृणमूळ काँग्रेसचे सरचिटणीस आणि नंबर २ चे नेते आहेत.
West Bengal CM Mamata Banerjee visits SSKM Hospital in Kolkata to meet TMC workers who were injured in Tripura yesterday. pic.twitter.com/en1O0Xs9ZO — ANI (@ANI) August 9, 2021
West Bengal CM Mamata Banerjee visits SSKM Hospital in Kolkata to meet TMC workers who were injured in Tripura yesterday. pic.twitter.com/en1O0Xs9ZO
— ANI (@ANI) August 9, 2021
ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरसंधान साधले. त्या म्हणाल्या, अमित शहांचे गुंड उत्तर प्रदेशापासून ते त्रिपूरा, आसामपर्यंत सगळीकडे गुंडगिरी करीत फिरतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करतात. निवडणूका जिंकण्यासाठी त्यांची वाटेल ते करण्याची आणि माणसांना मारण्यापर्यंत जाण्याची हद्द आहे, असे टीकास्त्र ममता बॅनर्जींनी सोडले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App