Assembly Election Results 2021 : पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूसह पाच राज्यांत मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. 2 मे रोजी (रविवारी) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होईल. अर्ध्या तासानंतर ट्रेंड येऊ लागतील. आणि संध्याकाळपर्यंत निश्चित होईल की, कोणत्या राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे. Assembly Election Results 2021 Of Five states West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala, Puducherry Live From Tomorrow 8 AM
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडूसह पाच राज्यांत मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे. 2 मे रोजी (रविवारी) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होईल. अर्ध्या तासानंतर ट्रेंड येऊ लागतील. आणि संध्याकाळपर्यंत निश्चित होईल की, कोणत्या राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे.
या पाचही राज्यांच्या मतमोजणीदरम्यान तुम्हाला thefocusindia.com या वेबसाइटवर सर्वात अचूक आणि जलद निकाल पाहायला मिळतील. याशिवाय निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना ट्रेंड, विश्लेषणात्मक बातम्या इत्यादींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहायला मिळतील. अचूक निकाल मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक, ट्विटर, यूट्यूब चॅनललाही फॉलो करू शकता.
याखेरीज अनेक वृत्तवाहिन्यांवरही निवडणुकीच्या निकालांचे अपडेट्स सुरू राहणार आहेत. सकाळी आठ वाजेपासूनच निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in/ यावर ट्रेंडसुद्धा दिसू लागतील. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यांमधील चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. तथापि, सर्व जागांवर निवडणुकीचा निकाल येईपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्येक माहिती देत राहू.
पश्चिम बंगालमध्ये 294 जागा, तामिळनाडूमधील 234, आसाममधील 126, केरळमधील 140 आणि पुडुचेरीच्या 30 जागांवर मतदान पार पडलेले झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या. येथे तृणमूल आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर आहे. एक्झिट पोल्समध्ये कुठे तृणमूल, तर कुठे भाजपचे पारडे जड दाखवण्यात आले आहे. यामुळे सर्वात उत्कंठावर्धक निकाल बंगालचाच ठरला आहे.
आसामविषयी बोलायचे तर एक्झिट पोलमध्ये भाजपची स्थिती मजबूत दिसून आली आहे. पुडुचेरीतील यूपीए आणि केरळमधील एलडीएफला कल देण्यात आला आहे. तामिळनाडूत मात्र अण्णाद्रमुकचे सरकार परत येऊ शकते. अर्थात हे सर्व एक्झिट पोल्सचे अंदाज आहेत. प्रत्यक्षात निकाल रविवारी कळणार आहे. यामुळे thefocusindia.com ला फॉलो करायला विसरू नका.
Assembly Election Results 2021 Of Five states West Bengal, Assam, Tamil Nadu, Kerala, Puducherry Live From Tomorrow 8 AM
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App