अमित शहा म्हणाले मलाही तिकिट नाकारले होते, एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जातात. संघटनेवर प्रचंड पकड आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्याला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा तिकिट नाकारले होते. अर्थात हे त्यांनी कार्यकर्त्याची समजूत घालतानाच सांगितले. Amit Shah said I was also denied a ticket, not once or twice but six times


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जातात. संघटनेवर प्रचंड पकड आणि कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्याला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा तिकिट नाकारले होते. अर्थात हे त्यांनी कार्यकर्त्याची समजूत घालतानाच सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये अमित शहा सध्या जोरदार प्रचार करत आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर प्रचाराबरोबरच कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना कामाला लावण्यातही ते माहिर आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या कार्यकत्यार्ची समजूत घालताना अमित शहा यांनी त्याला आपलेच उदाहरण दिले. ते म्हणाले गुजरातमधील भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदार संघासाठी तब्बल 6 वेळा उमेदवारी नाकारली होती.भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरचे खासदार होते. त्यामुळे अमित शहांना सहा वेळेस पक्षानं तिकीट नाकारले. अमित शहा अडवाणी यांचे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत न उभारण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतला. त्यानंतर भाजपाने अमित शहा यांना गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली.

अर्थात अमित शहा यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून कधीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट ते गांधीनगर मतदारसंघात ठाण मांडून बसत. अडवानी देशभर प्रचारासाठी जात. त्यांना अमित शहा यांच्यामुळे गांधीनगरची चिंता कधीही करावी लागत नव्हती.

Amit Shah said I was also denied a ticket, not once or twice but six times


वाचा…