All-Party Meeting : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवसआधी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

All Party Meeting Called by Union Minister Pralhad Joshi on 18th july before Mansoon Session

All Party Meeting : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. याबाबत माहिती देताना प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की, सर्वपक्षीय बैठक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसद भवनात 18 जुलैलाच सभागृह नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहू शकतात. All Party Meeting Called by Union Minister Pralhad Joshi on 18th july before Mansoon Session


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. याबाबत माहिती देताना प्रल्हाद जोशी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले की, सर्वपक्षीय बैठक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसद भवनात 18 जुलैलाच सभागृह नेत्यांची सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहू शकतात.

देशाच्या राजधानीत केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आठ महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, महागाई आणि कोरोना महामारी या मुद्द्यांवरून संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरू शकते. त्याचबरोबर सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठकही 18 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात सरकारची तयारी व रणनीतीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केली जाईल.

संसदेच्या दोन्ही सभागृहांत होणार 19 दिवस कामकाज

यापूर्वी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजाविषयी माहिती दिली होती. ओम बिर्ला म्हणाले, “संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्टदरम्यान चालवले जाईल आणि दोन्ही सभागृहांमध्ये 19 दिवस कामकाज होईल. सभागृहातील कामकाजाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 असेल. संसदेचे सर्व सदस्य आणि माध्यम प्रतिनिधींना केवळ कोरोना व्हायरस प्रोटोकॉल अंतर्गत प्रवेश मिळेल. तथापि, संसदेत प्रवेशासाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असणार नाही. बिर्ला म्हणाले की, आम्ही सर्वांना विनंती करतो की, त्यांनी कोरोनावरील लस घेतली नसेल तर त्यांनी आपली टेस्ट करून मगच संसदेत यावे.

All Party Meeting Called by Union Minister Pralhad Joshi on 18th july before Mansoon Session

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात