वृत्तसंस्था
जयपूर : आसाम आणि उत्तर प्रदेशातून सुरूवात झालेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून देशभर राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दोन भाजपशासित राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाची सुरूवात केल्यामुळे त्याला मुसलमान विरोधी रंग देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला आहे.In Rajasthan, the slogan of the Congress Health Minister is “Hum Do Hamara Ek”; Support population control policy
पण राजस्थानात मात्र काँग्रेसचे सरकार असूनही त्या विषयावर अनुकूल सूर उमटला आहे. राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. रघु शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. भारतात लोकसंख्या नियंत्रण धोरण आवश्यकच आहे. त्यासाठी आता हम दो हमारा एक हा नारा दिला पाहिजे, असे डॉ. रघू शर्मा म्हणाले आहेत.
Rajasthan | Growing population is a problem. The country has to think about controlling it so that future generations can have a better life. It is time for "Hum 2, hamare 1": Dr. Raghu Sharma, State Health Minister, on Population Control Bill pic.twitter.com/qYZjekX7o7 — ANI (@ANI) July 14, 2021
Rajasthan | Growing population is a problem. The country has to think about controlling it so that future generations can have a better life. It is time for "Hum 2, hamare 1": Dr. Raghu Sharma, State Health Minister, on Population Control Bill pic.twitter.com/qYZjekX7o7
— ANI (@ANI) July 14, 2021
वाढती लोकसंख्या ही खरेच संपूर्ण देशाला भेडसावणारी समस्या आहे. यावर देशात विचारमंथन झाले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काही चांगल्या जीवनाची शाश्वती ठेवायची असेल, तर लोकसंख्या नियंत्रण केलेच पाहिजे. आपला या पुढचा नारा हम दो हमारा एक हा असला पाहिजे, असे डॉ. रघू शर्मा यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App