अदानी पॉवर आणि गुजरात डिस्कॉमचा वाद मिटला, ११००० कोटींचा भरपाईचा दावा रद्द करण्यास सहमती


अदानी पॉवर आणि गुजरात ऊर्जा विकास निगम ( GUVNL) यांनी वीज खरेदी करार संपुष्टात आणण्यासंबंधीच्या वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढला आहे. खासगी वीज कंपनी असलेल्या अदानी पॉवरने गुजरात वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध 11,000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे. Adani power waive off 11000 crore settlement with Gujarat Govt Power company


वृत्तसंस्था

अहमदाबाद : अदानी पॉवर आणि गुजरात ऊर्जा विकास निगम ( GUVNL) यांनी वीज खरेदी करार संपुष्टात आणण्यासंबंधीच्या वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढला आहे. खासगी वीज कंपनी असलेल्या अदानी पॉवरने गुजरात वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध 11,000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे.

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घडामोडींशी संबंधित लोकांनी सांगितले की, दोन्ही कंपन्यांनी गेल्या आठवड्यात GUVNL ने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिका निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक संयुक्त अर्ज सादर केला.



सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या सेटलमेंट अर्जानुसार, अदानी पॉवरने नुकसानभरपाईचा दावा करण्याचा अधिकार सोडण्यास सहमती दर्शवली आहे. दोन्ही कंपन्या देशांतर्गत कोळशावर आधारित 1000-MW विजेची निर्मिती आणि पुरवठ्यासाठी नवीन दर निश्चित करतील. केंद्रीय विद्युत नियामक आयोगासमोर प्रलंबित असलेली कार्यवाही मागे घेण्यावरही पक्षकारांचे एकमत झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Adani power waive off 11000 crore settlement with Gujarat Govt Power company

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात