अब्दुल सत्तार कार्ड ऍक्टिव्हेट : काल गडकरींची स्तुती, आज चंद्रकांत खैरेंची टीका, दिल्लीत रावसाहेब दानवेंची गळाभेट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शिवसेनेत मुंबईतले सगळे नेते तुलनेने “राजकीय थंड” असताना काँग्रेसमधून शिवसैनिक आलेले अब्दुल सत्तार कार्ड अचानक ऍक्टिव्हेट का झाले आहे? Abdul Sattar card activated: Gadkari’s praise yesterday, Chandrakant Khaire’s criticism today, Raosaheb Danve’s hug in Delhi

काल त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची स्तुती करून शिवसेना-भाजप युतीची किल्ली त्यांच्या हातात असल्याची राजकीय मखलाशी केली होती. त्यावर आज शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत जोरदार टीका केली. त्याच वेळी त्यांनी अब्दुल सत्तार आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्यातील संबंध जगजाहीर आहेत असा टोलाही हाणून घेतला. ही टीका करून काही वेळ उलटतेय ना तोच दिल्लीत अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची गळाभेट घेतली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

– शिवसेनेत नेमक्या कोणत्या घडामोडी चालू आहेत?

मुंबईतल्या शिवसैनिकांची आमदार खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी काल रात्री घेतली आहे. पण मुंबईतले नेते सोडून काल परवा शिवसेनेत आलेले औरंगाबादचे नेते अब्दुल सत्तार यांचे कार्ड कसे काय ऍक्टिव्हेट झाले आहे?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यानंतर तसेच महाविकास आघाडीचे “निवडणूक गणित” जमणारच नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे मुंबईतले जुने जाणते नेते राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्हेट करण्याऐवजी शिवसेना पक्षनेतृत्वाने अब्दुल सत्तार कार्ड ऍक्टिव्हेट केले आहे का? याची कुजबुज शिवसेनेच्याच वर्तुळात सुरू झाली आहे.



निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित जमणारच नसेल तर शिवसेना एकटी लढून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत यश मिळणे दुरापास्त आहे. हे शिवसेना नेतृत्वाच्या लक्षात आल्यानेच पुन्हा शिवसेना-भाजप युती करण्याच्या चर्चांची पुडी सोडण्यात येत आहे का? राज्यातली महाविकास आघाडीची सत्ता शाबूत ठेवून महापालिका निवडणुकीपुरती शिवसेना-भाजप युती शक्य आहे का? शिवसेनेचे राजकीय अस्तित्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच धोक्यात आणत आहेत का? आणि त्यामुळेच पुन्हा एकदा शिवसेना नेतृत्वाने अब्दुल सत्तारांमार्फत भाजपला “राजकीय डोळा मारणे” सुरू केले आहे का??, अशा विविध सवालांवर शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात खल सुरू झाला आहे. पण या सगळ्याला भाजप कसा प्रतिसाद देतो? त्यावरच शिवसेनेचे “राजकीय डोळा मारणे” सफल होणार की असफल होणार? हे ठरणार आहे…!!

Abdul Sattar card activated: Gadkari’s praise yesterday, Chandrakant Khaire’s criticism today, Raosaheb Danve’s hug in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात