AB de Villiers retirement : एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून घेतला संन्यास, आयपीएलही खेळणार नाही


दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रँचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजे आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्येही खेळणार नाही किंवा बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. AB Devilliers has retired from all forms of cricket


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता या दिग्गज खेळाडूने फ्रँचायझी क्रिकेटलाही अलविदा म्हटले आहे. म्हणजे आता एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्येही खेळणार नाही किंवा बिग बॅश, पीएसएल किंवा इतर कोणत्याही लीगमध्ये खेळताना दिसणार नाही. एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली.

डिव्हिलियर्सने लिहिले की, ‘माझा प्रवास खूप छान होता, आता मी क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या घरामागे माझ्या मोठ्या भावांसोबत खेळायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी हा खेळ खूप एन्जॉय केला आहे. आता वयाच्या ३७ व्या वर्षी ती आग इतकी धगधगत नाही.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण T20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सच्या बॅटने 4 शतके, 69 अर्धशतके केली आहेत. 340 टी-20 सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 37.24 होती जी खरोखरच प्रशंसनीय आहे. मिस्टर 360 डिग्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सने आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले. यासोबतच त्याने 230 झेलही घेतले.

AB Devilliers has retired from all forms of cricket

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात