वृत्तसंस्था
चेन्नई ः साप-नागाच्या दर्शनानेच अनेकांची गाळण उडते. किंग कोब्रासारख्या धोकादायक सर्प फडा काढून तुमच्या दिशेने सरपटत आला तर मेंदूतून थंडगार लहर मणक्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. अशाच एका नागराजाचा सध्या ट्वीटरवर सुळसुळाट झाला आहे.
हा नागराज आहे तामिळनाडूतला. बिझनेस टायकून श्रीधर वेंबू यांनीच या बारा फुटी नागराजाला जगापुढे आणले आहे. त्यांची एक ट्वीटर पोस्ट जगभर व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी दोन छायाचित्रे ट्विट केली आहेत. वेंबू लिहितात – आपला श्वास रोखून ठेवा-12 फूट किंग कोब्रा ज्याने त्यांना नुकतीच भेट दिली. एका फोटोत झोहो कॉर्पोरेशनचे सीईओ आणि संस्थापक श्रीधर वेंबू आणि वन रेंजर्सनी बारा फुटी नागराजाला पकडल्याचे दिसते. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिली आहे, “एक दुर्मिळ 12 फूट लांब किंग कोब्राने आम्हाला भेट दिली”. ते पुढे म्हणतात, “आमचे अप्रतिम स्थानिक वन रेंजर्स आले आणि त्यांनी त्याला जवळच्या डोंगरांमध्ये सोडण्यासाठी पकडले. मी त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत आहे. खूप शुभ दिवस! ”
2019 च्या उत्तरार्धात, कोविड -19 साथीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी, श्रीधर वेम्बू दक्षिण तमिळनाडूतील नयनरम्य पश्चिम घाटातील टेंकसीजवळील माथलमपराय या गावी गेले होते. तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येते. वेम्बू यांनी हा नागराज ट्वीटरवर आणल्यानंतर अवघ्या काही तासातच जगभरातल्या हजारो लोकांचे लाइक्स त्याला मिळाले. प्रचंड आकाराचा नागराज पाहून ट्वीटर काही काळ स्तब्ध झाला. या छायाचित्रांवर प्रतिक्रीयांचा पाऊस पडला.
एकाने लिहिले, “सुपर. पोथीगाई टेकड्यांमध्ये किंग कोब्रा देखील आहेत हे माहित नव्हते. ” एका व्यक्तीने वेम्बू यांच्या ट्विटवर टीका केली आहे. नागांच्या मागे लागण्याचा उद्योग बरा नव्हे. हा उत्सव ठरू शकत नाही, असे त्याचे म्हणणे होते. त्यावर वेम्बू यांनी उत्तर दिले की, सर्पांची उपस्थिती ही निरोगी पर्यावरणाचा संकेत देणारी आहे. “जर आपण संपूर्ण इकोसिस्टमचे निर्जंतुकीकरण करत राहिलो तर ते फक्त सर्पच नव्हे तर अनेक जीवजंतू आपण गमवू,” असा इशारा त्यांनी दिला.
दुसर्या नेटकऱ्याने म्हटले की एवढा मोठा नाग कोणालाही “पॅनिक अटॅक” देऊ शकतो. जर मी एवढा मोठा नाग प्रत्यक्ष पाहिला असता तर मी जागच्या जागी गर्भगळीतच झालो असतो. एका नेटकर्त्याने नागाला हाताळताना लोक पुरेशी काळजी घेत नसल्याचे म्हणत “साप हाताळण्याचा अव्यवसायिक मार्ग. फोटोसाठी नागाला असे धरण्याचे कारण नाहीअसे सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App