आसाममध्ये समाजात विष पसरविणाऱ्या नागराज-सर्पराज यांची युती, शिवराजसिंह चौहान यांची काँग्रेसवर टीका

विशेष प्रतिनिधी

गुवाहटी : ज्यांनी आसाम घुसखोरांनी भरून टाकलाय त्या बद्रुद्दीन अजमल यांच्याशी काँग्रेसने युती केली आहे. अजमल यांचा अत्तरविक्रीचा व्यवसाय आहे, पण ते समाजात विष पसरवीत आहेत. नागराज आणि सर्पराज यांच्या युतीमुळे आसामचा विकास होणार नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर सभेत केली. CM Shivaraj Singh lashed on Congress

काँग्रेसने आसाममध्ये ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ), बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसफ), तर केरळमध्ये ऑल इंडिया मुस्लीम लिगबरोबर (आययुएमएल) युती केली आहे. याबाबत चौहान म्हणाले की, एआययुडीएफशी युती करण्याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.इतर राज्यांतही काँग्रेसचे हेच धोरण आहे. फोडा आणि झोडा असे राजकारण काँग्रेस करीत आहे. काँग्रेस पक्ष महात्मा गांधी यांच्या नव्हे तर जीना यांच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. त्यामुळे आसामचा आणि देशाचा विनाश होईल.

ते म्हणाले, बेकायदा स्थलांतर केलेल्यांचा काँग्रेसने मतपेढी म्हणून वापर केला.आता राहुल, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस इतिहासजमा होईल यात शंका नाही. काँग्रेसला केवळ नाटकबाजी, अतिरंजीतपणात रस आहे. त्यामुळे राहुल यांचे केरळमधील समुद्रात पोहणे हे नाट्यच होते.आसाममध्ये प्रियांका यांनी चहाची पाने खुडली, पण त्यासाठी हा मोसम नाही याची त्यांना कल्पनाच नाही. तेव्हा एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते का ?

CM Shivaraj Singh lashed on Congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*