landslide in Himachal : हिमाचलच्या किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्याने पूल तुटला, दिल्लीमधील ९ पर्यटकांचा मृत्यू

9 killed as bridge collapsed due to landslide in Himachal Kinnaur

 landslide in Himachal : भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे दरीवरचा पूल तुटला आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात स्थानिक नागरिकासह तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व 9 पर्यटक दिल्ली-एनसीआरमधील होते आणि किन्नौरला पर्यटनासाठी आले होते. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौरच्या संगल खोऱ्यात बटसेरीच्या गुंसाजवळ हा अपघात झाला. 9 killed as bridge collapsed due to landslide in Himachal Kinnaur


वृत्तसंस्था

किन्नौर : भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे दरीवरचा पूल तुटला आहे. या दुर्घटनेत 9 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात स्थानिक नागरिकासह तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व 9 पर्यटक दिल्ली-एनसीआरमधील होते आणि किन्नौरला पर्यटनासाठी आले होते. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौरच्या संगल खोऱ्यात बटसेरीच्या गुंसाजवळ हा अपघात झाला.

डोंगरातून दरड कोसळत असताना पर्यटकांनी भरलेले वाहन चितकुलहून संगलकडे येत होते आणि त्याचवेळी त्यांच्या वाहनांवरही मोठे दगड पडण्यास सुरुवात झाली. जोपर्यंत पर्यटकांना काही समजले असते त्यांचे वाहन दरडीखाली दबून गेली. जवळपास पार्क केलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

हेलिकॉप्टर बोलावले मदतीला

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर कॉंग्रेसचे आमदार जगतसिंग नेगी म्हणाले की, डोंगरावरून दरड कोसळण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. यामुळे बचाव कार्यात अडचण येत आहे. ते म्हणाले की, अपघाताची माहिती सरकारला देण्यात आली असून बचाव कार्याला वेग देण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर लवकरच येत असल्याचे आश्वासन मिळाले आहे.

शनिवारीही कोसळली दरड

शनिवारपासून हिमाचलच्या किन्नौरमध्ये दरड कोसळणे सुरू आहे. शनिवारी दुपारी संगल-चित्रकुल लिंक रोडवरील बाथसेरी येथील गुनसाजवळ एक दरड कोसळली होती, त्यामुळे बराच वेळ वाहतूक थांबविण्यात आली होती. यादरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही. या दुर्घटनेनंतर संगलहून चित्रकुलकडे जाणाऱ्या वाहतुकीला रोखण्यात आले आहे.

9 killed as bridge collapsed due to landslide in Himachal Kinnaur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात