मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्र सरकारच्या विरोधात बंडाच्या पवित्र्यात!!


वृत्तसंस्था

जयपूर : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे केंद्र सरकारच्या विरोधात बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये त्यांनी एक विधान करून आपला बंडाचा पवित्रा दाखवून दिला आहे.600 people have died in this farm movement… Even when an animal dies, Delhi ‘netas’ express condolences

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ६०० शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. परंतु, केंद्र सरकारने त्यांच्या दुखवट्याचा ठराव लोकसभेत मांडलेला नाही. दिल्लीत बसलेले नेते कुठल्याही राज्यात जनावरे मेली तरी वदुखवट्याचे संदेश पाठवतात. पण इथे शेतकऱ्यांचे बलिदान झाले आहे, त्याकडे त्यांचे लक्ष नाही, अशा शब्दांमध्ये सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढले आहेत.

त्या पुढे जाऊन ते म्हणाले, राज्यपालांना इतके सहज दूर करता येत नाही. पण मी दिल्लीच्या लोकांच्या फोनची वाट बघतो आहे. मी अजून काही आठवडे थांबायला तयार आहे. जर कृषी कायद्यांच्या विरोधात मी काही बोललो तर ती विधाने वादग्रस्त ठरतील. पण शेतकऱ्यांविषयी आपण संवेदना दाखवलीच पाहिजे, असे वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केले आहे.

सत्यपाल मलिक हे मेघालयाचे राज्यपाल होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल होते. त्यांना बाजूला करून केंद्र सरकारने तेथे मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. या मुद्द्यावरून सत्यपाल मलिक नाराज असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच गेले काही दिवस सत्यपाल मलिक हे केंद्र सरकारच्या विरोधात जाहीर कार्यक्रमांमध्ये अथवा पत्रकार परिषदांमध्ये उघडपणे वक्तव्य करत आहेत. केंद्र सरकारने आपल्या विरोधात कारवाई करावी यासाठीही चिथावणी असल्याचे मानले जात आहे. यातून कदाचित त्यांचा सक्रिय राजकारणातला मार्ग मोकळा होईल, असा त्यांचा होरा असावा असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

600 people have died in this farm movement… Even when an animal dies, Delhi ‘netas’ express condolences

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात