5 states election analysis : काँग्रेसचा मोठा political immunity lost, जी – २३ नेत्यांना जिंकणारा काँग्रेस कुळाचा नेता मिळाला


विनायक ढेरे

कोलकाता : पश्चिम बंगालसह पाचही राज्यांच्या निवडणूक ट्रेंडचा अधिकृत आकडेवारीनुसार धांडोळा घेतला तर काही बाबी आता स्पष्ट व्हायला लागल्या आहेत. कोरोनाच्या भाषेत बोलायचे झाल्यास काँग्रेसचा मोठा political immunity lost झालेला आहे आणि जो जी – २३ नेत्यांचा वर्ग विजयी नेत्याच्या प्रतिक्षेत होता, त्यांना काँग्रेसच्या कुळातील किंवा गोत्रातील नवा नेता मिळाला आहे.

  • ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसच्या बंगालमधील विजयी घोडदौडीनंतर वरील चर्चेने जोर धरला आहे. राहुल गांधींनी बंगालमध्ये अजिबात जोर लावला नव्हता. त्यांनी जोर लावला होता, केरळमध्ये. तेथे त्यांना पोरीबरोबरचे पुशअप्स आणि समुद्रतरण काही कामाला आले नाही. उलट ममता बॅनर्जींनी व्हिलचेअरवर बसून बंगाली अस्मितेला फुंकर घालून निवडणूक विजयाकडे वाटचाल सुरू ठेवल्याचे दिसत आहे.



  • एक जिद्दी नेता काय करू शकते, हे ममता बॅनर्जींनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि महाराष्ट्र लिमिटेड चाणक्यांना दाखवून दिले आहे. भाजपने ममता बॅनर्जींच्या प्रतिमेवर जेवढा जबरदस्त आघात केला, तेवढाच जबरदस्त प्रतिघात ममता बॅनर्जींनी केल्याचे निदान निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीतून तरी दिसते आहे.
  • हा खेला होबे आता फक्त विजयी – पराभूत जागांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो मतांच्या टक्केवारीपर्यंत पोहोचला आहे. इथे ममता बॅनर्जींनी सुरूवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपवर मात केल्याचे दिसत आहे.
  • याच विजयी फॉर्म्युलाची जी – २३ नेते वाट पाहात होते. काँग्रेसमध्ये गांधी परिवाराअंतर्गत त्यांना हा फॉर्म्युला सापडत नव्हता. तो ममता बॅनर्जींच्या रूपाने बंगालमध्ये सापडला आहे. आणि तो leading from the front करू शकतो आणि ठरूही शकतो.
  • यासाठी ममतांना नंदीग्राम हरूनही बंगालबाहेर जाण्याची जरूरत नाही. त्या बंगालमध्ये सत्तेवर राहुन देखील काँग्रेससाठी देशभर खेला करू शकतात. म्हणजे त्या तशी क्षमता दाखवू शकतात. या जिद्दीत त्यांचा स्वतःपेक्षा भाजपच्या आघाताचा जास्त वाटा आहे.
  • एका अर्थाने भाजपने ममतांवर आघात करून काँग्रेसच्या जी – २३ नेत्यांना २४ वा नेता मिळवून दिला आहे… अर्थात सगळे काँग्रेसजन हा नेता स्वीकारतात की नाही की पुशअप्स काढणाऱ्या नेत्याच्याच बाजूने ते उभे राहतात, हे येणारा काळच ठरवेल.

5 states election analysis; congress political immunity lost, G – 23 leaders gets new leader mamata banerjee

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात