बक्सरमध्ये गंगेच्या काठी मृतदेहांचा खच, प्रशासनानं झटकली जबाबदारी, यूपीकडे दाखवलं बोट

40 to 50 Dead bodies Float In Ganga River At Buxar, Administration On Alert After Video Viral

Dead bodies Float In Ganga River At Buxar : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर 40 ते 50 मृतदेह वाहून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने जबाबदारी झटकत हे मृतदेह उत्तर प्रदेशचे असल्याची शंका व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेक मृतदेह पाण्यावर तरंताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यावर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 40 to 50 Dead bodies Float In Ganga River At Buxar, Administration On Alert After Video Viral


विशेष प्रतिनिधी

बक्सर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर 40 ते 50 मृतदेह वाहून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने जबाबदारी झटकत हे मृतदेह उत्तर प्रदेशचे असल्याची शंका व्यक्त केली आहे. कोरोना महामारीच्या काळात बक्सर जिल्ह्यातील चौसाजवळील महादेव घाटाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेक मृतदेह पाण्यावर तरंताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यावर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार बीडीओ अशोक कुमार यांनी म्हटलंय की, जवळपास 40 ते 45 मृतदेह असतील, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून आले आहेत. हे सर्व महादेव घाटावर साचले आहेत. ते म्हणाले की, हे मृतदेह आमचे नाहीत. आम्ही तेथे एक पहारेकरी नेमला आहे, त्याच्या देखरेखीखाली मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू आहेत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, यूपीहून वाहून येणाऱ्या प्रेतांना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अशा परिस्थितीत आम्ही या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहोत.

खरे तर बक्सरसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा भयंकर संसर्ग आहे. दररोज मृतांची संख्या वाढते आहे. स्थानिकांच्या मते, कोरोना संसर्गामुळे येथे दररोज 100 ते 200 जण अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. लाकडाची व्यवस्था नसल्यामुळेच मृतदेह गंगेत फेकले जात आहेत. परंतु अशा प्रकारामुळे कोरोना संसर्ग जास्त पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा गंभीर प्रकारामुळे प्रशासनावर सर्वच स्तरांतून टीका सुरू आहे.

40 to 50 Dead bodies Float In Ganga River At Buxar, Administration On Alert After Video Viral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात