आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी

mla ranjit kamble Threatens district health officer in deoli wardha Phone Call Audio Viral

MLA Ranjit Kamble : देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. देवळी मतदारसंघात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यावरून आ. कांबळेंनी अधिकाऱ्यांना दम दिला. याशिवाय मारहाण करण्याची धमकीही दिल्याचं समोर आलं आहे. mla ranjit kamble Threatens district health officer in deoli wardha Phone Call Audio Viral


विशेष प्रतिनिधी

देवळी (वर्धा) : देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. देवळी मतदारसंघात कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यावरून आ. कांबळेंनी अधिकाऱ्यांना दम दिला. याशिवाय मारहाण करण्याची धमकीही दिल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

देवळी तालुक्यात नाचणगाव येथील शाळेत अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फोटोसेशन करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. यावर संतापून आमदार रणजित कांबळेंनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून शिवीगाळ केली. आमदारांनी केलेल्या फोनची कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.

‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना समोर आल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने याचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांना विचारणा केली असता अशी तक्रार सध्या मिळाली नसल्याचं सांगितलं.

mla ranjit kamble Threatens district health officer in deoli wardha Phone Call Audio Viral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण