विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद: गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळील तलावामधून गेल्या दोन वर्षांत तब्बल १९४ मगरी पकडून ह हलविण्यात आल्या आहेत. बोटींगचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तलावातील मगर हलविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.194 crocodiles caught in lake near Statue of Unity, steps taken to avoid endangering tourists
वडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याजवळ असलेल्या पंचमुली तलावामध्ये अनेक मगरी दिसल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना धोका असल्याचे मानले जात होते. केवडिया रेंज फॉरेस्ट ऑफिसर विक्रमसिंह गाभनिया यांनी सांगितले की, २०१२-२०१ ((आॅक्टोबर-मार्च) मध्ये आम्ही १४३ मगरींचे स्थानांतरित केले. २०२०-२१ मध्ये आणखी ५२मगरी गांधीनगर आणि गोध्रामधील दोन बचाव केंद्रात हलविण्यात आल्या. तलावामध्ये अजूनही गरी आहेत.
पंचमुली तलाव, ज्याला सरदार सरोवर धरणाचे ‘डायक-3’ म्हणून ओळखले जाते, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पर्यटकांसाठी हा तलाव विकसित केला आहे. त्यामुळे पर्यटकांचे धोका होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी मगरी हलविण्याचा निर्णय घेतला.
2019-20 मध्ये, सरदार सरोवर जलाशयात सोडवलेल्या 73 मगरी सोडण्यात आल्या. नंतर तलावातून पकडण्यात आलेल्या प्राण्यांना पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा आणि गांधीनगर येथील बचाव केंद्रात हलविण्यात आले. ते म्हणाले, मगरींना पकडण्यासाठी तलावाभोवती सुमारे 60 पिंजरे ठेवण्यात आले आहेत.
गुजरात राज्य वन विकास महामंडळ लिमिटेड (जीएसएफडीसी) ने पर्यावरण आणि पर्यटनाचा एक भाग म्हणून, वन्यजीव आणि समृद्ध वन्य जंगलांनी वेढलेल्या डायके – ३(पंचमुली तलाव) मध्ये बोटींग सुरू केले आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटी अथॉरिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोटींग हे येथे येणाºया पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे आणि विशेषत: आठवड्याच्या शेवटीही पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. नर्मदा नदीपात्रालगत असलेल्या स्टॅच्यू आॅफ युनिटीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App