मेव्हणा शेतकऱ्यांच्या जमीनीवर कब्जा घेतोय आणि हे मगरीचे अश्रू ढाळताहेत; स्मृति इराणी यांचा राहूल गांधीवर निशाणा


विशेष प्रतिनिधी 

अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राहूल गांधी यांच्यावर केली आहे. Smriti Irani targets Rahul Gandhi

अमेठी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना इराणी म्हणाल्या, कॉँग्रेसला राजकारण करण्यासाठी नव्या कृषि कायद्यांना विरोध करायाचा आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चुकीची माहिती पसरविली जात आहे. कृषि कायद्यांबाबत राहूल गांधी यांनी माझ्याशी जाहीर चर्चा करावी. मी त्यांना पटवून देईल की कृषि कायदे शेतकºयांसाठी कसे फायदेशिर आहेत.

इराणी म्हणाल्या, मोदी सरकारने शेतकºयांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. शेतकरी सन्मान योजनेचा हा निधी आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात एक लाख शेतकºयांना ३९ कोटी रुपये मिळाले आहेत. आजपर्यंत गांधी परिवाराने अमेठी मतदारसंघावर वर्षानुवर्षे राज्य केले.

मात्र, शेतकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळेच एके काळी गांधी परिवाराचा गढ म्हटला जाणारा अमेठी मतदारसंघ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची फळे चाखत आहे.

Smriti Irani targets Rahul Gandhi

राहूल गांधी यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत ४० हजार मतांनी पराभव झाला होता. पुढच्या वेळी जर ते येथून निवडणूक लढविण्यासाठी आले तर त्यांची काय अवस्था होईल, हे सर्वच जाणतात.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात