१३० कोटी भारतीयांमध्ये BJP DNA असल्याचे मोहन भागवतांना सिध्द करायचेय काय?; तृणमूळचे खासदार मदन मित्रांचा सवाल


वृत्तसंस्था

कोलकाता – हिंदू – मुसलमानांसह सर्व भारतीयांचा DNA एकच आहे, या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावरून येणाऱ्या तीव्र प्रतिक्रिया थांबायला तयार नाहीत.

आत्तापर्यंत दिग्विजय सिंग, असदुद्दीन ओवैसी, नबाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये आता पश्चिम बंगालमधील तृणमूळ काँग्रेसचे खासदार मदन मित्रा यांची भर पडली आहे.

१३० कोटी भारतीयांमध्ये फक्त BJP चा DNA असल्याचे मोहन भागवतांना सिध्द करायचेय काय?; असा खोचक सवाल तृणमूळ काँग्रेसचे खासदार मदन मित्रा यांनी केला आहे. ते म्हणाले, भागवतांचे जरी तसे म्हणणे असले, तरी ती वस्तुस्थिती नाही. भारतात काँग्रेस आणि तृणमूळ काँग्रेस देखील आहेत. त्यांचे देखील DNA काही भारतीयांमध्ये आहेत, अशी टिपण्णी मदन मित्रा यांनी केली.

मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले होते, की भारतातले हिंदू आणि मुसलमान हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. तेही गेल्या ४० हजार वर्षांपासून…!! हे आता सिध्द झाले आहे. सर्व भारतीयांचा DNA सारखा आहे. त्यामुळे हिंदू – मुस्लीम ऐक्य वगैरे शब्दांचा वापर करून अनेकदा हे दोन्ही समाज भिन्न असल्याचे भासविण्याचा प्रयत्न होतो. तो आपण य़शस्वी होऊ देता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला होता. यावर अनेक नेत्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Does he (RSS chief Mohan Bhagwat) want to prove that there is BJP in the DNA of 130 crore people of India?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात