ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या १०० स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : काल ख्रिसमसच्या निमित्ताने बेंगळूरमध्ये एक अनोखी रॅली पाहायला मिळाली. सांताक्लॉजच्या ड्रेस मध्ये जवळपास 100 स्त्रियांची बाइकवरून ही रॅली निघाली होती. ‘शी फॉर सोसायटी’ या एनजीओ मार्फ़त ही रॅली ऑर्गनाइज करण्यात आली होती.

100 women wearing Santa Claus dresses organized a bike rally in Bangalore on Christmas

हे एनजीओ आर्मी सेवेमधून निवृत्त झालेल्या फॅमिलीसाठी काम करते. शनिवारी ही रॅली कम्प्युटर सेंटर बनवण्यासाठी फंड उभे करण्यासाठी ऑर्गनाइज केली होती. कर्नाटकामधील कोल्हार जिल्ह्यातील बेलमांडे या गावात सेवानिवृत्त आर्मी सदस्यांच्या मुलांसाठी हे कम्प्युटर सेंटर बनवण्याचे एनजीओने ठरवले आहे.

कोल्हार डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 5000 आर्मी फॅमिलीत राहतात. जिल्ह्यातील प्रत्येक खेडे गावामध्ये जवळपास 35 ते 40 फॅमिलीज आहेत. तर एनजीओच्या फाउंडर हर्षिनी व्यंकटेश यांनी एनडीटीव्ही सोबत बोलताना सांगितले की, 200 सोलार किट्स आर्मी फॅमिलीना मागील दोन वर्षांमध्ये दिलेले आहेत.


बजरंग दलाने सांता क्लॉजचा पुतळा जाळला ; मुर्दाबादच्या दिल्या घोषणा


कोल्हार जिल्ह्यामधील बेलमांडे या खेडेगावामध्ये 50 आर्मी फॅमिलीत राहतात. त्यांच्या मुलांसाठी कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर उपलब्ध नव्हते. आणि हे सेंटर उभे करण्यासाठी ही रॅली ऑर्गनाइज करण्यात आली होती. ह्या रॅलीच्या स्पॉन्सर्सनी देखील 7 कम्प्युटर्स हे ट्रेनिंग सेंटर उभे करण्यासाठी दिलेले आहेत.

सेंटर उभे करण्यासाठी लागणारे बाकी सामान घेण्यासाठी त्यांनी ही रॅली ऑर्गनाईज केली होती. अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या रॅली दरवेळी ऑर्गनाईज करून ते सामाजिक कार्यासाठी फंड उभे करण्याचे काम या एनजीओमार्फत करतात, असे देखील हर्षिनी व्यंकटेश यांनी एनडीटीव्ही सोबत बोलताना सांगितले होते.

100 women wearing Santa Claus dresses organized a bike rally in Bangalore on Christmas

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात