सावरकर – हिंदुत्व – गाय : लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाच्या शिवानंद तिवारींकडून दिग्विजय सिंह यांचे समर्थन!!


वृत्तसंस्था

पाटणा : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्व आणि गाय या विषयांवर लिहिलेल्या मुद्द्यांचा विपर्यास करून काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर काल वार करून घेतले. दिग्विजयसिंग यांच्या याच मुद्द्यांची री आज लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी ओढली आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाचा हवाला देत त्यांनी भाजप नेतृत्वावर देश नकारात्मक पद्धतीने बदलण्याचे प्रयत्न करण्याचा आरोप केला आहे. Veer Savarkar questioned how can an animal be a mother or father of a human being

शिवानंद तिवारी म्हणाले, की सावरकरांनी गोमांस खाण्याचे समर्थन केले आहे की नाही माहिती नाही. पण सावरकरांनी हे स्पष्ट लिहिले आहे की कोणताही प्राणी मनुष्याची माता अथवा पिता होऊ शकत नाही. गाय हे जनावर आहे आणि त्यामुळे तिला मनुष्याची माता म्हणणे हा संपूर्ण मनुष्यजातीचा अपमान आहे..

सावरकरांनी 1923 मध्ये प्रथम हिंदुत्व या शब्दाचा प्रयोग केला. हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे वेगवेगळे आहे, असे त्यांनीच लिहिले आहे. परंतु सध्याचे राज्यकर्ते त्यांचे हिंदुत्व मानतात. पण त्यांनी व्यक्त केलेले गाई संदर्भातले विचार मान्य करत नाहीत. त्याचबरोबर सध्याचे राज्यकर्ते आपला सनातनधर्म हजारो वर्षांपूर्वीचा आहे, असे मानतात. परंतु सावरकरांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे वेगवेगळे आहेत असे सांगितले आहे. त्यामुळे सनातन धर्मातील वेद उपनिषदे पुराणे हे सगळे बाजूला काढून सावरकरांनी 1923 मध्ये जी हिंदुत्वाची व्याख्या केली तीच खरी आहे, असे मानून चालतात. हे हिंदू धर्माच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे, असा दावाही शिवानंद तिवारी यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी भाजपवर निशाणा साधताना सावरकरांच्या गाई विषयक मतांचा विपर्यास करून भोपाळमध्ये काल मांडणी केली होती. सावरकरांनी गोमांस खाण्याचे समर्थन केल्याचा दावा त्यांनी केला होता. याच मुद्द्यावर आधारित शिवानंद तिवारी यांनी गोमांसाचा मुद्दा बाजूला काढत बाकीच्या सर्व मुद्द्यांवर दिग्विजय सिंग यांच्याशी सहमती दर्शविली आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

Veer Savarkar questioned how can an animal be a mother or father of a human being

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात