केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारताने शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मेगा मॅचमध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून वर्ल्ड कप 2023 मधील उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. भारताच्या या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, “संघाचे अभिनंदन आणि भविष्यातील सामन्यांसाठी शुभेच्छा.” असे म्हटले आहे. World Cup 2023 PM Modi and Amit Shah congratulate Team India for victory over Pakistan
त्याचवेळी मध्य प्रदेशच्या सीएम हाऊसमध्ये मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवून विश्वचषकातील भारताच्या विजयाचा आनंद साजरा केला.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘तिरंगा उंच उंच फडकत आहे, या शानदार विजयासाठी आमच्या क्रिकेट संघाला टाळ्यांचा कडकडाट. या संघाने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे की, एक समान ध्येय असलेले अखंड टीमवर्क आपल्या देशाला किती वैभव मिळवून देऊ शकते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, “क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वाचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना 200 पेक्षा कमी धावांवर रोखून उत्कृष्ट योगदान दिले. फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि लक्ष्य सहज गाठले. दमदार विजयाची नोंद केल्याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App