IND vs PAK WC 2023 : रोहित शर्माच्या धडाकेबाज खेळीने, भारताचा पाकिस्तानावर सात गडी राखून दणदणीत विजय


भारतीय गोलंदांजासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टेकले गुडघे

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे लक्ष लागलेला भारत विरुध्द पाकिस्ताना हा पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामाना झाला. हा सामान बघण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. IND vs PAK WC 2023  India defeated Pakistan by seven wickets

याचबरोबर भारताने या विश्वचषकात सलग तिसरा विजय मिळवला आहे. या अगोदर भारतीय संघाने  ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध  विजय मिळवला होता.  टीम इंडियाचा पुढचा सामना १९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा पाकिस्तानवर हा आठवा विजय आहे.

श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारताविरुद्ध 200 च्या आत गडगडला!!

भारताचा कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज ८६ धावांची खेळी करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याला श्रेयय अय्यरने अर्धशतकी खेळी करत मोलाची साथ दिली. याशिवाय शुबमन गिल आणि विराट कोहली व के एल राहुल यांनीही चांगले योगदान दिले. त्या अगोदर भारती गोलंदाजाने भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला अवघ्या १९२ धावांमध्ये बाद केले.

IND vs PAK WC 2023  India defeated Pakistan by seven wickets

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात