वृत्तसंस्था
अहमदाबाद : श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक स्पर्धेत हैदराबाद मध्ये विश्वविक्रम करणाऱ्या पाकिस्तानचा डाव अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये मात्र गडगडला. श्रीलंकेविरुद्ध 345 धावांचा विक्रम करणाऱ्या पाकिस्तानी संघाला भारताने आज 200 च्या आत गुंडाळले. पाकिस्तानी संघ भारतापुढे अवघे 192 धावांचे आव्हान उभे करू शकला. बाबर आझम वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे पाय रोवून उभा राहू शकला नाही. pakistan vs india Pakistan’s innings collapsed inside 200 against India
भारतीय गोलंदाजांनी तिखट मारा करून कर्णधार रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजी देण्याचा निर्णय सार्थ ठरविला. बाबर आझम सारखा स्टार फलंदाज देखील भारतीय गोलंदाजी समोर टिकू शकला नाही. भारताविरुद्ध त्याला जेमतेम अर्धशतक करून तंबूमध्ये परतावे लागले.
श्रीलंकेच्या 344 धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने 48.2 षटकांमध्ये 345 धावा करून विश्वचषक क्रिकेट मधला विश्वविक्रम नोंदविला होता. हैदराबाद मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना प्रचंड प्रोत्साहन मिळाले त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी आपण जणू काही पाकिस्तान मध्येच खेळत असल्याचा खेळत असल्याचा “भास” होत असल्याचे सांगितले होते. पण हैदराबाद मधला “भास” आमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये मात्र “आभास” ठरला. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे पाकिस्तानी दिग्गज फलंदाजांना नांगी टाकावी लागली.
भारताकडून बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या सर्वांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानने भारतीय संघापुढे अवघे 192 धावांचे आव्हान ठेवले आहे
pakistan vs india Pakistan’s innings collapsed inside 200 against India
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण