‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!

भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात आज केवळ भारतीय प्रेक्षकांचेच नाहीतर अवघ्या जगभराचे लक्ष लागलेला भारत विरुध्द पाकिस्ताना हा पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामाना झाला. हा सामान बघण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यानंतर इस्रायलच्या राजदूतांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे. After Indias victory Israels ambassador Naor Gilon challenged Pakistan

इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचा समाचार घेतला आहे. भारताच्या विजयाने आम्ही आनंदी आहोत, मात्र पाकिस्तानी संघ आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही. असे ते म्हणाले.

वास्तविक, नाओर यांचे हे विधान पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानच्या विधानावर उपहासात्मक मानले जात आहे, जे रिझवानने नुकतेच श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर आपले शतक गाझामधील लोकांना समर्पित केले होते. याशिवाय इस्रायलच्या राजदूतांनी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पोस्टरद्वारे इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या क्रिकेट चाहत्यावरही  प्रतिक्रिया दिली. यावर नाओर म्हणाले की, आम्ही याबाबत खूप भावूक आहोत.

After Indias victory Israels ambassador Naor Gilon challenged Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात