Rahul Gandhi : राहुल गांधी ‘भ्रष्टाचाराच्या दुकाना’वर कारवाई करणार का? – भाजपचा सवाल

Rahul Gandhi

जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजपने मुख्यमंत्री सिद्धरामय्यां यांचा राजीनामा मागितला आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या  ( Siddaramaiah ) यांना आज (२४ सप्टेंबर) उच्च न्यायालयाकडून जमीन वाटप घोटाळा प्रकरणात (मुडा प्रकरण) धक्का बसला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या आदेशाविरोधात दाखल केलेली त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेत नमूद केलेल्या तथ्यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले की, राज्यपाल खटल्याला मंजुरी देण्यास सक्षम आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी भाजप कर्नाटकनेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.



भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस पक्षाने आम्हाला सांगावे की सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदावर कायम राहणे योग्य आहे का? सिद्धरामय्या यांनी पदावरून पायउतार व्हावे.

भाजपचे प्रवक्ते पुढे म्हणाले की त्यांनी (मुख्यमंत्री सिद्धरामय्या) एससी/एसटी समुदायातील लोकांसाठी राखून ठेवलेली जमीन लुटली. MUDA घोटाळ्यात 5000 कोटींचा भ्रष्टाचार झाला. सिद्धरामय्या यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना फायदा झाला. काँग्रेस पक्षाला अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांची पर्वा नाही. राहुल गांधी ‘भ्रष्टाचाराच्या दुकाना’वर कारवाई करणार का?

Will Rahul Gandhi take action against shops of corruption Question of BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात