Pulwama : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा मृत्यू ; जाणून घ्या, कसा?

Pulwama

बिलाल अहमद कुची असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव आहे


विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचा सोमवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याला हृदयविकाराचा झटका आला. बिलाल अहमद कुची असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. पुलवामा हल्ल्यातील आरोपी कुची काकापोरा येथील हाजीबल गावचा रहिवासी होता. पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील १९ आरोपींच्या यादीत त्याचे नाव होते.



पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली त्याची कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर घुसवली. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. तर आठ जवानही जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यातील आरोपीची किश्तवाड जिल्हा कारागृहात प्रकृती खालावली होती. त्यानंतर आरोपी बिलाल अहमदला १७ सप्टेंबरला जम्मू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे सोमवारी रात्री उशिरा त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले.

Death of Pulwama terrorist attack accused

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात