Gas explosion : कोळसा खाणीत गॅसचा स्फोट; 28 कामगार ठार, 17 हून अधिक जखमी

Gas explosion

जाणून घ्या, कुठे घडली आहे ही भयानक दुर्घटना?


विशेष प्रतिनिधी

इराणमधून मोठी बातमी येत आहे. येथील कोळसा खाणीत गॅसचा स्फोट ( Gas explosion ) झाला आहे. या दुर्घटनेत काम करणाऱ्या 28 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 17 हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींना कोळसा खाणीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर कोळसा खाणीत गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीत गॅसचा स्फोट होताच कामगारांची इकडे-तिकडे धावपळ सुरू झाली. संपूर्ण खाणीत एकच गोंधळ उडाला. मात्र हा स्फोट कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणची राजधानी तेहरानपासून 540 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला असलेल्या तबास शहरातील कोळशाच्या खाणीत स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आपत्कालीन जवानांना या भागात पाठवण्यात आले आहे. स्फोट झाला तेव्हा खाणीत 70 मजूर काम करत होते.

या प्रांताचे राज्यपाल मोहम्मद जावेद केनात यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 30 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचवेळी या अपघातावर इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी सांगितले की, त्यांनी अधिकाऱ्यांना फसलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Gas explosion in coal mine 28 workers killed more than 17 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात