Mohammed yunus : हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत उत्तरे देण्याच्या भीतीपोटी मोहम्मद युनूस यांनी अमेरिकेत टाळली मोदींबरोबरची बैठक!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेला संबोधित करण्याच्या निमित्ताने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहम्मद युनूस  ( Mohammed yunus ) अमेरिका दौऱ्यावर आहेत. परंतु, बांगलादेशातील हिंसाचाराच्या घडामोडी आणि हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत उत्तरे द्यायला लागतील, या भीतीपोटी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची बैठक टाळली.



मोदी आणि मोहम्मद युनूस हे दोन्ही नेते अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी गेले आहेत. परंतु त्यांची एकत्रित बैठक आयोजित करणे शक्य होते. तसा विशिष्ट वेळ दोन्ही देशांच्या प्रमुखांना काढता आला असता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याशी बोलताना बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचाराचा मुद्दा काढतील आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्याला उत्तरे द्यावी लागतील, हे लक्षात घेऊन मोहम्मद युनूस आणि त्यांच्या टीमने मोदींबरोबरची युनूस यांची भेटच टाळली. त्याऐवजी मोहम्मद युनूस फक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय बैठकीत सामील होतील.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या एकत्रित बैठकीच्या वेळा जुळत नसल्याचे कारण देऊन पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्यात भेट होणार नसल्याचे सांगितले. त्याऐवजी जयशंकर आणि युनूस यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असल्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेली.

Mohammed yunus avoids to meet Modi in USA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात