Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन

Rameshbhai oza haryana 

विशेष प्रतिनिधी

पुणे : जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन 20 सप्टेंबर रोजी हरियाणातील सेवा साधना व ग्राम विकास केंद्र, समालखा येथे गुजरातचे प्रसिद्ध भागवत कथाकार पूज्य रमेशभाई ओझा यांच्या शुभहस्ते झाले. Rameshbhai oza haryana

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रमेशभाई म्हणाले की, देवाने आपल्या सर्वांना एकत्र जीवन जगण्याची संधी दिली आहे. आयुष्य एकमेकांच्या सोबतीने जगले पाहिजे. भागवतात तीन संदेश आहेत – माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, त्याने संपूर्ण सृष्टी आणि सजीवांशी कसे वागले पाहिजे आणि निसर्गाशी कसे वागले पाहिजे. या तिन्ही क्रिया माणसाच्या यज्ञाला अधिक उंचीवर घेऊन जातात. त्यामुळे समाजाचे कल्याण आणि राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते. देशाची अखंडता आणि एकात्मता टिकून राहावी तसेच इतर परधर्मी लोक पोहोचून नयेत वनवासींचा फायदा घेऊ नये यासाठी मी सर्व संत-मुनींना वनक्षेत्रात कथा आणि प्रवचनासाठी बोलवत असतो.

प्रारंभी सिक्कीमच्या भगिनींनी बुद्ध प्रार्थना सादर केली. या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले रा. स्व. संघाचे सह-सरकार्यवाह रामदत्तजी म्हणाले, की वनवासी कल्याण आश्रमाला 3 वर्षानंतर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या जनजातीमध्येही आपले काम नाही त्यांच्या पर्यंत पोचण्याचा संकल्प घेऊन आपण सर्व कार्यकर्त्यांनी येथून जायला हवे.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य, कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह, उपाध्यक्ष एच.के.नागू आणि तेची गुबिन, महामंत्री योगेश बापट, संघटन मंत्री अतुल जोग, मध्य प्रदेश जनजातीय सल्लागार समितीच्या सदस्या उर्मिला भारती आणि हरियाणा युनिटचे अध्यक्ष राम बाबू उपस्थित होते.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, लडाख, जम्मू कश्मीर, पूर्वांचल आणि दक्षिण भारतातील राज्यांसहित देशातील सर्व राज्यांमधील जनजातीय प्रतिनिधी आणि कार्यकर्ता उपस्थित होते. या तीन दिवसीय कार्यकर्ता संमेलनात सर्व कार्यकर्त्यांसोबत देशातील विविध भागातील वनवासी कल्याण आश्रमाच्या गतिविधि आणि कार्यक्रमासहित वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येईल. प्रांताचे कार्यकर्ते आपापल्या कार्यक्रमाचे वृत्त कथन करतील तसेच अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन प्राप्त करतील.

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आपल्या संबंधित संस्थांच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आरोग्य ग्रामविकास व स्वावलंबन इत्यादीशी संबंधित 22,152 प्रकल्पांचे संचालन देशातील 17, 394 ठिकाणी करत आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलन दर तीन वर्षांनी आयोजित करण्यात येते.
रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते 21 सप्टेंबर सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन झाल्यानंतर देशातील 80 वेगवेगळ्या जनजाती प्रतिनिधी आपापल्या रीती रिवाज आणि परंपरेनुसार आपल्या जनजातीय पूजा पद्धतीचे सादरीकरण करून एकतेचा संदेश देतील तसेच जनजाती भैय्या— बहन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

संमेलन स्थळी वनवासी कल्याण आश्रमाची प्रगती, कामगिरी आणि मुख्य कार्यक्रमांचे चित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. तसेच पुस्तकांचे विक्री केंद्र लावण्यात आले आहे.

Rameshbhai oza haryana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात