विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane भाजपचे आमदार नितेश राणे कथितपणे मुस्लिमांच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. नितेश राणे यांच्या मुस्लिम विरोधी भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान होते आहे, असा दावाही सतीश चव्हाण यांनी पत्रात केला आहे. Nitesh Rane on NCP Nawab Malik case
दोनच दिवसांपूर्वी अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीतल्या नेत्यांना झापल्याची किंवा खडे बोल सुनावल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. महायुतीतल्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी संयम बाळगून कुठल्याही समाजाविषयी बोलावे किंवा प्रतिक्रिया व्यक्त करावी असे अजितदादांनी सगळ्यांना सुनावल्याचे त्या बातमीत नमूद केले होते. Nitesh Rane
पण अजितदादांनी आपल्याच पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी किंवा रूपाली चाकणकर यांना फटकारल्याचे काही कुठल्या माध्यमांमध्ये दिसले नाही. अमोल मिटकरी सातत्याने असा नॅरेटिव्ह सेट करतात जो महायुतीला डॅमेजिंग ठरतो. ते महायुतीच्या घटक पक्षाचे प्रवक्ते आहेत, की महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडावा इतपत अमोल मिटकरींचे नॅरेटिव्ह महायुतीच्या विरोधात विशेषत: भाजप विरोधात असते. त्याबद्दल अजितदादांनी त्यांना फाटकारल्याचे कुठे दिसले नाही.
Share Market : शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला
हिंदू व्रतांवर चाकणकरांचा आक्षेप
रुपाली चाकणकरांनी मुक्ताईनगरमध्ये महिला मेळाव्यात भाषण करताना महिलांनी सोळा सोमवार, चौदा गुरुवार यांच्या सारख्या व्रतांच्या मागे न लागता संविधान वाचावे. शिक्षण घ्यावे. सोळा सोमवार, चौदा गुरुवार, पंधरा रविवार यात महिलांनी वेळ घालवू नये. कारण महिलांवर अत्याचार झाले तर काय करायचे हे संविधानात लिहिले आहे. पोथ्या पुराणांमध्ये ते लिहिलेले नाही, असे सुनावले. बाकी त्यांनी भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती गायली. पण हे सगळे करताना त्यांनी फक्त हिंदू व्रतांना टार्गेट केले, की ज्याची काहीच गरज नव्हती. सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची महती गाताना महिलांनी शिक्षण घेणे, संविधान वाचणे हे रूपाली चाकणकर यांनी सांगावे, यात गैर काहीच नाही त्यावर आक्षेप असायचे ही कारण नाही, पण ते सगळे सांगताना फक्त हिंदू व्रतांनाच टार्गेट करण्याची गरज आहे का??, हा सवाल अजितदारांनी रूपाली चाकणकरांना विचारल्याची बातमी कुठे प्रसिद्ध झाली नाही. Nitesh Rane
फडणवीसांचे पत्र
सतीश चव्हाण यांनी देखील नितेश राणे यांच्या विरोधात कारवाईचे पत्र लिहिताना जुन्या नवाब मलिक प्रकरणाचाच राजकीय बदला भाजपवर घेतल्याचे दिसून आले. गँगस्टर आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या म्होरक्यांशी नवाब मलिकांनी मनी लॉन्ड्रिंग केले म्हणून त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते विधानसभा अधिवेशनात सामील झाले. ते महायुतीच्या बाकांवर बसले म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजितदादांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुती बाहेर काढले. नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी करून अजितदादांच्या राष्ट्रवादीने नबाब मलिक प्रकरणाचा राजकीय बदला घेतल्याचे स्पष्ट झाले. कारण नवाब मलिकांवर ज्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे, तसा कुठलाही आरोप नितेश राणे यांच्यावर नाही, पण केवळ मुस्लिम लांगूलचालन चालवण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीने नितेश राणेंवर कारवाईची मागणी केली. यानिमित्ताने त्यांनी वाड्याचे तेल वांग्यावर काढले, हेच उघडपणे दिसून आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App