Nitin gadkari : घराणेशाही पक्षांना मतदान करू नका, ते एका मिनिटात होतील सरळ; पवार – सोनियांच्या पक्षांना गडकरींनी ठोकले!!

Nitin gadkari

विशेष प्रतिनिधी

नागपूर : आपल्याच मुलांना प्रमोट करणाऱ्या, मुलांना तिकिटासाठी आग्रह धरणाऱ्या घराणेशाही पक्षांना मतदान करू नका. ते एका मिनिटात सरळ होतील, अशा परखड शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  (  Nitin gadkari )यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या पक्षांसकट सगळ्या घराणेशाही पक्षांना ठोकून काढले. आपल्याच मुलांना राजकारणात प्रमोट करणाऱ्या शरद पवार, सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांच्या प्रवृत्तीविरोधात गडकरी यांनी एल्गार पुकारला.

पण मराठी माध्यमांनी गडकरींच्या भाषणाच्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात असल्याच्या स्वरूपात रंगवून दिल्या. वास्तविक नितीन गडकरी यांनी सगळ्यात मोठा प्रहार घराणेशाही पक्षांवर केला. परंतु, तो मुद्दा “पवार बुद्धी”च्या मराठी माध्यमांनी दडपून टाकला आणि नितीन गडकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलल्याचा आभास निर्माण केला.



 नागपुरात बोलताना नितीन गडकरी म्हणाले :

– लोकशाहीत सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने प्रखर टीका सहन करावी. राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने सहन करावे. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावे. टीका सहन करणे ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते. साहित्यिक,विचारवंतांनीही परखडपणे विचार मांडावे. विश्वगुरु व्हायचे असेल, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हावे लागेल.

– आपल्या लोकशाहीमध्ये साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल, विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखड पणे मांडले पाहिजेत. लोकशाहीची सर्वांत मोठी परीक्षा कोणती असेल, तर राजाच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजेत आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाही मधील अपेक्षा असते. आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आहे आपले काय चुकलं काय बरोबर आहे!!

– महाराष्ट्र संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगला आहे ते आपण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की, त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मीयांची पूजा, मंदिर उद्ध्वस्त केली नाहीत. विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला. एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला. सर्वधर्मसमभावाच जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे.

– सध्या महाराष्ट्रात बरंच जातीपातीचे राजकारण सुरू आहे, मी कधीही जात-पात पाळत नाही. मी 50000 लोकांसमोर सांगितलं, मी जात-पात पाळणार नाही,मी जातीपातीचे राजकारण करणार नाही. जो करेगा जात की बात उसको मारुंगा कसके लाथ, जिसको देना वोट दो, जिसको नही देना मत दो. मला मत द्या देऊ नका, तरी मी सगळ्यांची काम करणार आहे. मी  मतदान देणार त्यांचं पण काम करणार जे नाही देणार त्यांचे पण काम करणार!!

– घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, ते एका मिनिटात सरळ होतील. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते. त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही, तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे आणि लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे!!

Nitin gadkari hits out at dynasty politics of pawar, Sonia and others!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात