Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती


देशाने बुधवारी आपला सर्वात मोठा लष्करी अधिकारी गमावला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आयएएफ एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, 8 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या दुःखद मृत्यूच्या घटनेची माहिती देण्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर हजर झालो आहे. What happened when CDS Bipin Rawat’s helicopter crashed? Who will investigate the incident? Rajnath Singh informed Parliament


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाने बुधवारी आपला सर्वात मोठा लष्करी अधिकारी गमावला. तामिळनाडूतील कुन्नूर येथे आयएएफ एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, 8 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांच्या दुःखद मृत्यूच्या घटनेची माहिती देण्यासाठी मी तुम्हा सर्वांसमोर हजर झालो आहे.

दुर्घटनेनंतर काय घडले?

CDS जनरल बिपिन रावत हे वेलिंग्टनच्या संरक्षण सेवेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या नियोजित दौऱ्यावर होते. IAF च्या Mi-17V-5 हेलिकॉप्टरने बुधवारी सकाळी 11:48 वाजता सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले, जे 12.15 वाजता वेलिंग्टनमध्ये उतरणार होते. सुलूर हवाई तळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाचा हेलिकॉप्टरशी 12.8 वाजण्याच्या सुमारास संपर्क तुटला.



नंतर कुन्नूरच्या स्थानिक लोकांनी जंगलाला आग लागलेली पाहिली. जेव्हा ते जवळ पोहोचले तेव्हा त्यांना लष्करी हेलिकॉप्टर आगीत जळून गेलेले दिसले. स्थानिक प्रशासनाचे एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातस्थळावरून वाचलेल्यांना बाहेर काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. हेलिकॉप्टरमधून बाहेर काढता आलेल्या सर्व लोकांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला.

कोण करणार घटनेची चौकशी?

हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, भारतीय हवाई दलाने (IAF) लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेची त्रि-सेवा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, तपास पथक काल वेलिंग्टनला पोहोचले आणि तपास सुरू केला आहे.

१३ जणांचा मृत्यू

राजनाथ म्हणाले की मृतांमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका, त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार, लान्स नाईक बी साई. तेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश आहे. .आज संध्याकाळी सर्व पार्थिव दिल्लीत आणले जाणार आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. सीडीएस विपिन रावत यांच्यावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

What happened when CDS Bipin Rawat’s helicopter crashed? Who will investigate the incident? Rajnath Singh informed Parliament

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात