विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाचे नवे प्रमुख अर्थात सीडीएस म्हणून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव जरी आघाडीवर असले आणि ते जरी नवे सीडीएस झाले झाले तरी त्यांच्या पुढची आव्हाने सोपी नसतील. भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही विभागांची एकात्मिक शक्ती उभे करण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करायचे आहे. New challenges facing new CDs; Creation of Theater Command – Action !!
थिएटर कमांडच्या निर्मितीचे काम सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी सुरू केले होते. हवाई दल पायदळ आणि नौदल यांच्या एकत्रित फौजेचे प्रहार क्षमता वाढवण्याचे काम हे त्यांच्या पुढचे मोठे आव्हान होते. यांनी त्याचा आराखडा निश्चित केला होता. तिन्ही दलांचा मिळून एक कमांड बनविणे, तिन्ही दलांच्या साधन सामग्रीचा समन्वयाने वापर करणे, तिन्ही दलांच्या मनुष्यबळाचा एकत्रित वापर करणे आणि प्रहार क्षमता वाढविणे हा थिएटर कमांडचा उद्देश त्यांनी निश्चित केला आहे. थिएटर कमांड फक्त पायदळाच्या प्रभुत्वाखाली असेल हा गैरसमज देखील त्यांनी दूर केला आहे. जिथे ज्या दलाची प्रमुख आवश्यकता त्या दलाच्या नेतृत्वाखाली थिएटर कमांड कार्यरत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. उदाहरणार्थ अंदमान सारख्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रदेशात नौदलाच्या नेतृत्वाखाली थिएटर कमांड अस्तित्वात येईल आणि कार्यरत राहील, तर पहाडी क्षेत्रांमध्ये हवाई दलाच्या नेतृत्वाखाली थिएटर कमांड कार्यरत राहील. यामध्ये पायदळ, नौदल आणि हवाई दल यांच्यात भेदभावाचा प्रश्न उद्भवत नाही, तर एकात्मिक फौजेची ताकद वाढविणे आणि सर्व साधनसामग्रीचा एकात्मिक वापर करणे हे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जनरल बिपिन रावत यांच्या जागी जे कोणी नवीन सीडीएस असतील त्यांच्यापुढे जनरल बिपिन रावत यांनी तयार केलेला थिएटर कमांडचा आराखडा प्रत्यक्षात आणण्याचे काम असेल.
भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत हे भारतीय सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचे आणि लष्करी सुधारणांचे अध्वर्यू मानले जातात. जनरल बिपिन रावत हे सध्या भारतीय सैन्य दलांसाठी थिएटर कमांडच्या निर्मितीच्या प्रयत्नात होते. चीन बॉर्डर वर भारतीय सैन्यदलांची थिएटर कमांड त्यांनी स्थापित केली. सैन्यदलाच्या तिन्ही शाखांची एकत्रित फौज पाऊस आणि त्या फौजेचे नेतृत्व विशिष्ट कमांडकडे असे त्याचे स्वरूप आहे.
संपूर्ण देशात चार थिएटर कमांड तयार करून एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन या शत्रू राष्ट्रांना भारतीय सैन्य दल यांच्या संयुक्त शक्तीद्वारे मुकाबला करण्याची त्यांची तयारी होती. अर्थात जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले असले तरी थिएटर कमांडची निर्मिती थांबणार नाही. कारण हे काम संस्थात्मक पातळीवर पुढे जाऊन सैन्यदलाच्या उत्तर थिएटर कमांडची निर्मिती झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना सामावणारी थिएटर कमांड आता चीन बॉर्डर वरची सर्व सुरक्षाव्यवस्था सांभाळेल. तिचे मुख्यालय लष्कराच्या मध्यवर्ती कमांड मध्ये लखनऊला असेल. येथूनच चीन बॉर्डर वरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थांची हाताळणी होईल. लष्कराच्या पश्चिम विभागाकडे याची जबाबदारी राहणार नाही. लष्कराचा पश्चिम विभाग हा पश्चिम बॉर्डरची निगराणी करेल.
अर्थात उरलेल्या तिन्ही थिएटर कमांड अद्याप अस्तित्वात यायच्या आहेत. परंतु_ त्यांचे काम वेगाने सुरू आहे. भारताच्या तीनही सैन्य दलाचे एकत्रीकरण म्हणजे १+१+१= तीन असे राहत नाही, तर ते १११ होते, अशा शब्दांत जनरल बिपिन रावत यांनी थिएटर कमांडचे वर्णन केले आहे. तीनही सैन्यदलांचा शक्तींच्या एकत्रीकरण यानंतर जी आघात क्षमता भारतीय सैन्यदलाला प्राप्त होईल त्या आघात क्षमतेपुढे शत्रूचा नायनाट होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा आत्मविश्वास त्यांनी भारतीय सैन्यदलामध्ये जागविला आहे. आणि त्यादृष्टीनेच थिएटर कमांडचा निर्मितीकडे ते गांभीर्याने पाहत होते. या थिएटर कमांडची लवकरात लवकर निर्मिती करणे आणि भारताच्या 4 थिएटर कमांड कडे संपूर्ण देशाची सुरक्षा व्यवस्था सोपवणे हा खऱ्या अर्थाने जनरल बिपिन रावत यांचा वारसा पुढे देण्यासारखे आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App