भारतीय सैन्यदलांच्या प्रचंड आघात क्षमतेच्या थिएटर कमांडवर काम करत होते जनरल बिपिन रावत!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे सीडीएस जनरल बिपिन रावत हे भारतीय सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाचे आणि लष्करी सुधारणांचे अध्वर्यू मानले जातात. जनरल बिपिन रावत हे सध्या भारतीय सैन्य दलांसाठी थिएटर कमांडच्या निर्मितीच्या प्रयत्नात होते. चीन बॉर्डर वर भारतीय सैन्यदलांची थिएटर कमांड त्यांनी स्थापित केली. सैन्यदलाच्या तिन्ही शाखांची एकत्रित फौज पाऊस आणि त्या फौजेचे नेतृत्व विशिष्ट कमांडकडे असे त्याचे स्वरूप आहे.CDS General Bipin Rawat was working on theatre command of army

संपूर्ण देशात चार थिएटर कमांड तयार करून एकाच वेळी पाकिस्तान आणि चीन या शत्रू राष्ट्रांना भारतीय सैन्य दल यांच्या संयुक्त शक्तीद्वारे मुकाबला करण्याची त्यांची तयारी होती. अर्थात जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले असले तरी थिएटर कमांडची निर्मिती थांबणार नाही. कारण हे काम संस्थात्मक पातळीवर पुढे जाऊन सैन्यदलाच्या उत्तर थिएटर कमांडची निर्मिती झाली आहे.



हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांना सामावणारी थिएटर कमांड आता चीन बॉर्डर वरची सर्व सुरक्षाव्यवस्था सांभाळेल. तिचे मुख्यालय लष्कराच्या मध्यवर्ती कमांड मध्ये लखनऊला असेल. येथूनच चीन बॉर्डर वरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थांची हाताळणी होईल. लष्कराच्या पश्चिम विभागाकडे याची जबाबदारी राहणार नाही. लष्कराचा पश्‍चिम विभाग हा पश्चिम बॉर्डरची निगराणी करेल.

अर्थात उरलेल्या तिन्ही थिएटर कमांड अद्याप अस्तित्वात यायच्या आहेत. परंतु_ त्यांचे काम वेगाने सुरू आहे. भारताच्या तीनही सैन्य दलाचे एकत्रीकरण म्हणजे १+१+१= तीन असे राहत नाही, तर ते १११ होते, अशा शब्दांत जनरल बिपिन रावत यांनी थिएटर कमांडचे वर्णन केले आहे. तीनही सैन्यदलांचा शक्तींच्या एकत्रीकरण यानंतर जी आघात क्षमता भारतीय सैन्यदलाला प्राप्त होईल त्या आघात क्षमतेपुढे शत्रूचा नायनाट होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा आत्मविश्वास त्यांनी भारतीय सैन्यदलामध्ये जागविला आहे. आणि त्यादृष्टीनेच थिएटर कमांडचा निर्मितीकडे ते गांभीर्याने पाहत होते. या थिएटर कमांडची लवकरात लवकर निर्मिती करणे आणि भारताच्या 4 थिएटर कमांड कडे संपूर्ण देशाची सुरक्षा व्यवस्था सोपवणे हा खऱ्या अर्थाने जनरल बिपिन रावत यांचा वारसा पुढे देण्यासारखे आहे…!!

CDS General Bipin Rawat was working on theatre command of army

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात