CDS Bipin Rawat Death : बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव उद्या आणणार दिल्लीत, लष्कर प्रमुखांनीही व्यक्त केला शोक

CDS Bipin Rawat Death Tomorrow the Mortal Remains of CDS Bipin Rawat and His Wife will be brought to Delhi

CDS Bipin Rawat Death : तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात बुधवारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवान शहीद झाले. कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यान कोसळलेल्या एमआय-सीरीज हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहायक, सुरक्षा कमांडो आणि हवाई दलाचे पायलट यांच्यासह एकूण 14 जण होते. अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. CDS Bipin Rawat Death Tomorrow the Mortal Remains of CDS Bipin Rawat and His Wife will be brought to Delhi


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात बुधवारी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवान शहीद झाले. कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यान कोसळलेल्या एमआय-सीरीज हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी, संरक्षण सहायक, सुरक्षा कमांडो आणि हवाई दलाचे पायलट यांच्यासह एकूण 14 जण होते. अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

उद्या दिल्लीत आणणार पार्थिव

सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचे मृतदेह गुरुवारी दिल्लीत आणण्यात येणार आहेत. तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत श्रद्धांजली

भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांसाठी 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले आणि सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि इतर मंत्री उपस्थित होते.

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी व्यक्त केला शोक

भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आणि लष्कराच्या सर्व श्रेणीतील अधिकाऱ्यांनी दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. लष्कराने सांगितले की, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे एक दूरदर्शी होते, ज्यांनी भारतीय सैन्यात अनेक सुधारणा सुरू केल्या.

CDS Bipin Rawat Death Tomorrow the Mortal Remains of CDS Bipin Rawat and His Wife will be brought to Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”