विशेष प्रतिनिधी
जयपूर : विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा शाही विवाहसोहळा जयपूरमध्ये संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी आपली हजेरी लावली आहे. कॅटरिना कैफचा एकेकाळचा बॉयफ्रेंड सलमान खान याची फॅमिली देखील या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमान खान आणि त्याच्या घरच्यांसोबत कॅटरिनाचे चांगले रिलेशनस आहेत. कॅटरिनाने एका मुलाखती मध्ये सलमान खानच्या फॅमिलीचे आभार मानले होते. कारण ती जेव्हा भारतात करियर बनवण्यासाठी आली होती तेव्हा ती कोणालाही ओळखत न्हवती. त्यावेळी सलमानच्या घरच्यांनी तिला आधार दिला होता.
Salman Khan will not go for Katrina Vicky’s wedding! Salman Khan’s sister Arpita revealed that they did not receive the invitation
कॅटरिना आणि विकीच्या वयात असलेल्या अंतरावर काय म्हणाली कंगना राणावत?
याचमुळे सलमान खान आणि त्याच्या घरचे कॅटरिना विकीच्या लग्नात उपस्थिती राहणार का अश्या चर्चा होत्या. बातमी अशीही होती की कॅटरिना कैफची इच्छा होती की सलमान खानच्या आईवडीलांनी लग्नामध्ये उपस्थित राहून तिला आशीर्वाद द्यावेत. पण आता नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार सलमान खानची बहिण अर्पिता हिने याचा खुलासा केला आहे की, त्यांना कोणतेही आमंत्रण मिळालेले नाहीये. त्यामूळे ह्या सर्व चर्चांना फुल स्टॉप मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more