CDS Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेवर माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला संशय, एनआयए चौकशीची केली मागणी


बुधवारी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचाही मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. CDS Helicopter Crash Former Brigadier Sudhir Sawant expresses suspicion over helicopter crash, demands NIA probe


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बुधवारी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचाही मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला, तर एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घातपात की अपघात?

बुधवारी जेव्हा दुर्घटनेची माहिती आली तेव्हा संपूर्ण देशात खळबळ उडाली. आता या घटनेतही कट असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा अपघात नसून कट असल्याचा आरोप त्यांनी केला. एलटीटीचे स्लीपर सेल यामागे असू शकतात कारण जिथे अपघात झाला आहे, तो भाग एलटीटीचाच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी या घटनेची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हवाई दलाचे चौकशीचे आदेश

अपघातानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले होते. आता हवाई दल आपल्या स्तरावर अपघाताच्या कारणाचा तपास करत आहे. मात्र, हा अपघात कसा झाला आणि त्यामागे काही षडयंत्र आहे का, याबाबत हवाई दलाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सीडीएस बिपिन रावत हे वेलिंग्टन (निलगिरी हिल्स) येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) येथे जात असताना ही दुर्घटना झाली, तेथे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते.



रशियन बनावटीचे Mi-17V5 हेलिकॉप्टर

जनरल बिपिन रावत हे हवाई दलाच्या एमआय-१७व्ही५ हेलिकॉप्टरमध्ये होते ज्याला अपघात झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. हवाई दलाकडून सांगण्यात आले की, DSSC चे डायरेक्टिंग स्टाफ ग्रुप कॅप्टन वरुण सिंग एससी या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. “हेलिकॉप्टरमधील जनरल बिपिन रावत, मधुलिका रावत आणि अन्य 11 जणांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत खेदाने पुष्टी होत आहे,” असे हवाई दलाने ट्विट केले आहे.

सीडीएस रावत आणि इतरांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरने सकाळी 11.48 वाजता जवळच्या कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केले ते 45 मिनिटांनी उधगमंडलममधील DSSC, वेलिंग्टन येथे उतरणार होते. दुपारी १२.२२ वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी, सीडीएस दिल्लीहून सकाळी ११.३४ वाजता एम्बर विमानाने हवाई दलाच्या तळावर पोहोचले होते.

CDS Helicopter Crash Former Brigadier Sudhir Sawant expresses suspicion over helicopter crash, demands NIA probe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात