विशेष प्रतिनिधी
मुंबई : सा. विवेक प्रकाशित ‘सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशन रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार, दि. १० डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वा. हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होणार आहे. सोहळ्याचे आयोजन एम.जी.डी.मिशन इंडियाच्यावतीने करण्यात आले आहे. Book on Annabhau sathe to be published on 10 dec in Mumbai
अण्णाभाऊंनी अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीने सारा महाराष्ट्र गाजवला. जिथे अन्याय दिसला तिथे त्यांनी लेखणीचा प्रहार केला. कामगार चळवळीत अग्रभागी राहून त्यांना न्याय मिळवून दिला. कामगार चळवळीच्या निमित्ताने त्यांनी रशियाला भेट दिली त्यावेळच्या त्यांच्या आठवणी देखील खूप गाजल्या. अण्णाभाऊंच्या लेखन साहित्य कर्तृत्वाचा धांडोळा घेण्याचा साप्ताहिक विवेक मी प्रयत्न केला आहे त्यातून हा ग्रंथ साकारला अाहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more