भारताच्या सीमा सुरक्षेसाठी मोदी सरकारने नेमके काय केले??; वाचा आकडेवारी सह तपशील!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी नेमके काय केले??, असा सवाल राहुल गांधींपासून सर्व विरोधी नेते वारंवार विचारत असतात. विरोधकांच्या या प्रश्नांना वेगवेगळी उत्तरे देखील दिली जातात. पण संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारने केलेली कामगिरी गेल्या कित्येक सरकारांच्या पेक्षा वेगळी आणि उजवी ठरली आहे, हे आकडेवारीने सिद्ध होते.  What exactly did the Modi government do for India’s border security?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या 59 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात याविषयीची तपशीलवार माहिती दिली.

ती अशी :

येत्या दोन वर्षांत संपूर्ण पाकिस्तान आणि बांगलादेश सीमा कुंपण घालून सुरक्षित केली जाईल. आत्तापर्यंत, सीमेचा 1100 किलोमीटर परिसर फ्लडलाइट्सने कव्हर करण्यात आला आहे. संपूर्ण सीमा उजळवून टाकण्यात येणार आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफच्या 542 नवीन सीमा चौक्या उभारून सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी 510 ऑब्झरवेशन पोस्टचे टॉवर बांधण्यात आले आहेत.

पहिल्यांदाच हरामी नाला परिसरात निरीक्षण मनोरे बांधण्यात आले आहेत.

637 बीएसएफ चौक्यांवर वीज आणि सुमारे 500 ठिकाणी पाण्याची जोडणीही देण्यात आली आहे. याशिवाय 472 ठिकाणी सोलर प्लांट बसवून सीमेवर रक्षण करणाऱ्या बीएसएफ जवानांची सोय सुनिश्चित करण्यात आली आहे.

बीएसएफने गेल्या 5 वर्षांत तब्बल 30000 किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त केले. छाप्यांचे काम सतत सुरू आहे. सीमा सुरक्षा दलाने 2500 हून अधिक शस्त्रे हस्तगत केली, तर 90 हून अधिक परदेशी ड्रोन पाडले.

नवी दिल्लीत ड्रोन आणि सायबर फॉरेन्सिक लॅबची स्थापना करून संशोधन आणि विकास क्षेत्रात खूप चांगले काम सुरू आहे. केंद्र सरकारने बीएसएफ ला फील्ड फॉर्मेशनसह 100 ड्रोन प्रदान केले आहेत.

नक्षलींच्या प्रभावातून देश पूर्णपणे मुक्त होईल. गेल्या 10 वर्षांत नक्षली हिंसाचाराच्या घटना 52 %, तर मृत्यूच्या घटना 70 % कमी झाल्या आहेत.

नक्षलवाद प्रभावित जिल्हे एकेकाळी 200 + होते, ते आता 45 वर आले आहेत. नक्षलवाद प्रभाव असलेल्या पोलिस ठाण्यांची संख्या एकेकाळी 800 + होती, ती आता 176 वर आली आहे.

मोदी सरकारने (CAPF) निमलष्करी दलांच्या 13000 सैनिकांना घरे दिली. त्यांच्यासाठी 113 नवीन बॅरेक बांधल्या आहेत. लवकरच निमलष्करी दलांच्या जवानांना आणखी 11000 घरे दिली जातील आणि आणखी 108 बॅरेक देखील बांधल्या जातील.

2023 या वर्षाअखेरीस गेल्या 5 वर्षातील 24000 हून अधिक निमलष्करी दलांच्या जवानांना घरे देण्याचे काम पूर्ण होईल. या शिवाय, सीएपीएफ ई-हाऊसिंग पोर्टलद्वारे 70000 हून अधिक सैनिकांना घरांचे वाटप करण्यात आले आहे.

What exactly did the Modi government do for India’s border security?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात