हम होंगे कामयाब ! कोरोना लढाईत MEIL चं आणखी एक योगदान ; आधी ऑक्सिजन आता ३००० बेडचं कोव्हिड रुग्णालय

मेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये ३ हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे.


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे . कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठा वाटा उचलत  मेघा इंजिनिअरिंगने तामिळनाडूमध्ये ३ हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारलं आहे. यापूर्वीही MEILने ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने थेट थायलंडवरुन अद्ययावत ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर मागवले. त्यामुळे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा ३ राज्यांमधील रुग्णालयांना वेगाने ऑक्सिजन पुरवठा करणं शक्य झालं. We will win together: MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu



मेघा इंजिनिअरिंगचा जगभरात २० देशांमध्ये पसरले आहे. हैदराबादस्थित असलेल्या या कंपनीने केवळ तेलंगाना, आंध्र प्रदेशातच नाही तर आता तामिळनाडूमध्येही मोठी मदत केली आहे. कंपनी आता तामिळनाडूत ३ हजारपेक्षा जास्त बेडचं कोव्हिड रुग्णालय उभारत आहे. त्यापैकी ६६० बेड कार्यरत झाले आहेत. याचा फायदा तामिळनाडूतील प्रमुख शहर चेन्नई, मदुरैसह परिसरातील तालुक्यांना होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे केवळ ७२ तासात ५०० ऑक्सिजन बेड उभे करुन रुग्णसेवा सुरु केली आहे.

मोफत उपचार

तामिळनाडूत उभं राहात असलेल्या या रुग्णालयात राज्य सरकारकडून मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी तामिळनाडू सरकारसह क्रेडाय जि. रियल्टर्स यासारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला.

चेन्नईत १०७० ऑक्सिजन बेड

MEIL कडून तामिळनाडूची राजधानी चेन्नईत विविध रुग्णालयात १०७० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जात आहे. यापैकी ६०० बेडची व्यवस्था झाली आहे. तर भविष्यात ३०० ऑक्सिजन बेडची निर्मिती MEIL कडून केली जाणार आहे.

We will win together: MEIL Establishes more than 3000 beds covid center in Tamilnadu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात